पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करा
पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करा

पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करा

sakal_logo
By

02840
कुरुंदवाड ः येथील बैठकीत मार्गदर्शन करताना बाबुराव महामुनी. उपस्थित बालाजी भांगे, अमित पाटील आदी.
---------
पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करा
बाबुराव महामुनी; कुरुंदवाड येथे बैठकीचे आयोजन
कुरुंदवाड, ता. २३ ः आगामी गणेशोत्सव सार्वजनिक मंडळांनी पर्यावरण पूरक, सामाजिक उपक्रमाने व पारंपरिक वाद्याचा वापर करून शांततेत साजरा करावा, असे आवाहन इचलकरंजीचे पोलिस उपाधीक्षक बाबुराव महामुनी यांनी येथे केले.
दरम्यान गणेशोत्सव काळात सोशल मीडियावर सायबर क्राईमची करडी नजर आहे.त्यामुळे सोशल मीडियाचा वापर करत असताना सामाजिक हित जोपासत करावे, असे ही उपअधीक्षक महामुनी यांनी सांगितले. येथील वृंदावन मंगल कार्यालयात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आयोजित शांतता कमिटीच्या बैठकीत ते बोलत होते. सहाय्यक पोलिस निरीक्षक बालाजी भांगे, उपनिरीक्षक अमित पाटील, नगरसेवक उदय डांगे, अक्षय आलासे आदी उपस्थित होते.
श्री. भांगे म्हणाले, ‘गणेश उत्सव साजरा करत असताना जातीय सलोखा राखला पाहिजे याची खबरदारी सर्व मंडळांनी घेणे गरजेचे आहे. त्याचबरोबर पोलिस प्रशासन व शासनाने दिलेल्या अटी नियमांचे पालन करावे.’ जितेंद्र साळुंखे, दीपक परीट, प्रवीण खबाले, सागर गवळी आदींनी सूचना मांडत पोलिस प्रशासनाच्या आवाहनानुसार सण साजरा करण्याची ग्वाही दिली. कुमार कोरवी, रमेश जाधव, शुभम जोंग, विराज पाटील, वृषभ डांगे, महेश आलासे, किरण मालगावे, महादेव माळी आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Krw22b01901 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..