मोकाट कुत्र्यांचा पुन्हा हल्ला शेतकरी गंभीर जखमी. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मोकाट कुत्र्यांचा पुन्हा हल्ला शेतकरी गंभीर जखमी.
मोकाट कुत्र्यांचा पुन्हा हल्ला शेतकरी गंभीर जखमी.

मोकाट कुत्र्यांचा पुन्हा हल्ला शेतकरी गंभीर जखमी.

sakal_logo
By

कुत्र्यांच्या हल्ल्यात
दत्तवाडला शेतकरी गंभीर
कुरुंदवाड, ता. १ ः दत्तवाड (ता. शिरोळ) येथील भटक्या कुत्र्यांनी पुन्हा एकदा एका शेतकऱ्यावर हल्ला करून अंगभर चावे घेऊन गंभीर जखमी केले. ही घटना आज घडली. सचिन अण्णासोा सिदनाळे (वय ४५) असे जखमी शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांच्यावर सांगली शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. भटक्या कुत्र्यांनी हल्ला करण्याची ही सहावी वेळ असून, त्यापैकी दोनवेळा दोघांचा मृत्यू झाला होता. आठवड्यापूर्वी लहान मुलीचे कुत्र्यांनी लचके तोडून तिला गंभीर जखमी केले होते. आज पुन्हा एकदा कुत्र्यांनी शेतकऱ्‍यावर हल्ला करून जखमी केले. कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी जोर धरली आहे.
सचिन सिदनाळे आज शेतात घुगऱ्‍या टाकायला गेले असता चार-पाच कुत्र्यांच्या टोळक्याने त्यांच्यावर हल्ला करून अंगभर चावे घेतले. त्यात गंभीर जखमी झाले. त्यांच्या ओरडण्याचा आवाज ऐकून आसपासचे शेतकरी धावून आले. त्यांनी त्यांची सुटका केली. जखमी अवस्थेत सचिन याला उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात नेले. त्यानंतर सांगली शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

Web Title: Todays Latest Marathi News Krw22b01911 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..