‘कुरुंदवाड बँके’ला दोन कोटींवर नफा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘कुरुंदवाड बँके’ला दोन कोटींवर नफा
‘कुरुंदवाड बँके’ला दोन कोटींवर नफा

‘कुरुंदवाड बँके’ला दोन कोटींवर नफा

sakal_logo
By

02860

--------------------
‘कुरुंदवाड बँके’ला दोन कोटींवर नफा
अरुण आलासे; सभासदांना १४ टक्के लाभांश देणार
कुरुंदवाड, ता. ५ ः स्वातंत्र्य सेनानी (कै.) श्रीपाल आलासे (काका) कुरुंदवाड अर्बन बँकेने सभासद, ठेवीदार व कर्जदारांच्या प्रगतीसाठी काम केले आहे. विश्वासार्हता, काटकसर, पारदर्शी कारभारामुळे बँकेला गत आर्थिक वर्षात दोन कोटी आठ लाखांचा नफा झाला आहे. सभासदांना १४ टक्के लाभांश देण्यात येणार असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष अरुण आलासे यांनी दिली.
येथील जैन सांस्कृतिक भवन येथे स्वा. से. कै. श्रीपाल आलासे (काका) कुरुंदवाड अर्बन को-ऑप. बँकेची वार्षिक सभा आयोजित केली होती. त्यावेळी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. श्री. आलासे म्हणाले, ‘बँकिंगमध्ये विश्वासार्हता महत्त्वाची असून स्थापनेपासून बँकेने विश्वास जपला असून
स्पर्धात्मक परिस्थितीतही बँकेच्या ठेवीत १२ कोटी ६० लाख १७ हजारांची वाढ होऊन बँकेच्या ठेवी २७६ कोटी ७९ लाख ३९ हजार रुपये झाल्या आहेत. आगामी काळात ३०० कोटींच्या ठेवींचे उद्दिष्ट आहे. बँकेचे खेळते भांडवल १५ कोटी ९९ लाख ७४ हजार रुपये आहे. गुंतवणूक १२४ कोटी ७४ लाख आहे. ऑडिट अ वर्गची परंपरा यंदाही कायम राखली आहे. बँकेला तीन नवीन शाखा सुरू करण्याची परवानगी मिळाली आहे.’
बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शांतीनाथ कनवाडे, संचालक नंदकुमार पाटील, प्रदीप पाटील, दीपाली पाटील आदींनी विषय पत्रिकेचे वाचन केले. ज्येष्ठ नेते रावसाहेब पाटील, संचालक आण्णासाहेब जोग, मोनाप्पा चौगुले, अण्णासाहेब चौगुले, सुधाकर पाटील, महावीर थोटे, सुनील पाटील, सुनिता पाटील आदी उपस्थित होते. उपाध्यक्ष महादेव धनवडे यांनी आभार मानले.

Web Title: Todays Latest Marathi News Krw22b01913 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..