करवाढ आकारणी रद्द करण्यासाठी लढा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

करवाढ आकारणी रद्द करण्यासाठी लढा
करवाढ आकारणी रद्द करण्यासाठी लढा

करवाढ आकारणी रद्द करण्यासाठी लढा

sakal_logo
By

करवाढ आकारणी रद्द करण्यासाठी लढा
उगळे, सावगावे; कुरुंदवाड पालिकेकडून मिळकतींचे मोजमाप सुरू
कुरुंदवाड, ता. १८ ः पालिकेने चतुर्थ वार्षिक करवाढ करण्याच्या दृष्टीने मिळकतीचे मोजमाप सुरू केले आहे. चार वर्षांत महापूर आणि कोरोनाच्या लागोपाठच्या आपत्तीने नागरिक आर्थिक संकटात सापडले आहेत. त्यामुळे यावर्षीची करवाढ आकारणी रद्द करावी, यासाठी तीव्र लढा उभारण्यात येणार आहे, अशी माहिती शिवसेना तालुकाप्रमुख वैभव उगळे व शहरप्रमुख बाबासाहेब सावगावे यांनी पत्रकार बैठकीत दिली. याप्रश्नी प्रशासक तथा मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देऊन आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी सोमवारी (ता. १९) पालिकेसमोर मिळकतधारकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन त्यांनी केले.
ते म्हणाले, ‘जिल्हा नगररचना विभागाचे सहायक संचालकांच्या आदेशानुसार चतुर्थ वार्षिक कर आकारणी करून २० टक्के करवाढीच्या नोटिसा लागू करण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्या पार्श्वभूमीवर पालिकेने जुन्या मिळकतींचे फेरमूल्यांकन करायला सुरवात केली आहे. शहरात सहा हजार चारशे मिळकती असून बांधकाम, यंत्रमाग कामगार, शेतमजुरांची संख्या मोठी आहे. चतुर्थ वार्षिक करवाढ मिळकतधारकांना न परवडणारी व अन्यायी आहे. ती रद्द करावी, अशी मागणी करण्यात येणार असून सोमवारी प्रशासक तथा मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देऊन पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यात येणार आहे. मिळकतधारकांनी आज सकाळी पालिकेसमोर मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन केले आहे. दयानंद मालवेकर, आप्पासाहेब भोसले, सुहास पसोबा, राजेंद्र बेले, आप्पासाहेब गावडे, मिलिंद गोरे, संतोष नरके, पंत माळी, रामभाऊ माळी आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Krw22b01926 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..