साखर कारखाने नोव्हेंबरमध्ये सुरू करा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

साखर कारखाने नोव्हेंबरमध्ये सुरू करा
साखर कारखाने नोव्हेंबरमध्ये सुरू करा

साखर कारखाने नोव्हेंबरमध्ये सुरू करा

sakal_logo
By

साखर कारखाने नोव्हेंबरमध्ये सुरू करा
भाजपचे रवींद्र शहापुरे यांची साखर आयुक्तांकडे मागणी
कुरुंदवाड, ता. १९ ः साखर कारखाने ऑक्टोबरमध्ये सुरू करणे ऊस उत्पादक शेतकरी व साखर कारखान्यासाठी नुकसानीचे ठरणार असून शासनाने ऑक्टोबरऐवजी नोव्हेंबरमध्ये साखर कारखाने सुरू करण्यासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे शिरोळ तालुका सरचिटणीस रवींद्र शहापुरे यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन साखर आयुक्त शेखर गायकवाड यांना दिले आहे.
निवेदनातील आशय असा, यंदा ऊस पीकक्षेत्रातही मोठी वाढ व अनुकूल वातावरण यामुळे बंपर पीक आले असून यंदाचा हंगाम उशिरापर्यंत चालण्याची शक्यता गृहीत धरून कारखाने ऑक्टोबरमध्ये सुरू करण्याच्या हालचाली सुरू आहेत. मात्र, लगेचच गळीत हंगाम सुरू करणे सद्यःस्थितीत फायद्यापेक्षा नुकसानीचे ठरण्याची शक्यता अधिक आहे. राज्यात अद्याप मुसळधार पाऊस सुरू आहे. शेतात ये- जा करण्यासारखी स्थिती दिसत नाही. ऑक्टोबरमधील उष्णतेमुळे उसाच्या शेतजमिनीतील ओलावा कमी होणार आहे. साखर कारखाने नोव्हेंबरमध्येच सुरू करावेत.’

Web Title: Todays Latest Marathi News Krw22b01928 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..