Mon, Jan 30, 2023

पन६
पन६
Published on : 25 September 2022, 6:03 am
अपघात मृत्यूप्रकरणी
पतीवर गुन्हा दाखल
कुरुंदवाड : दत्तवाड (ता. शिरोळ) येथे मोटारसायकलच्या चाकात स्कार्फ व साडी अडकून झालेल्या अपघातात मुलगी ठार झाल्याप्रकरणी सासऱ्याने जावयाविरुद्ध येथील पोलिसात फिर्याद दिली. जावयावर गुन्हा दाखल झाला. प्रकाश आप्पासो मुळीक (देसाई इंगळी, ता. चिक्कोडी, जि. बेळगाव) असे जावयाचे नाव आहे. दत्तवाड, दानवाड रस्त्यावर २३ ऑगस्टला दुपारी साडेबाराच्या सुमारास मुळीक पत्नी सीमासह मोटारसायकल क्र(एम एच.१० ए. टी २०७६) वरून जात होते. त्यावेळी मोटारसायकलीच्या मागच्या चाकात सीमा हिची साडी अडकली व त्या गाडीवरून खाली पडल्या. जोराचा मार बसल्याने त्या गंभीर जखमी झाल्या होत्या. मिरज येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असताना २८ ऑगस्ट रोजी त्याचा मृत्यू झाला होता.