
वृत्तपत्र अंक विक्रेता संघटना पदाधिकारी निवड
02898
१)रायाप्पा बाळीगेरे
02897
२)नागेश गायकवाड
-------------
शिरोळ तालुका वृत्तपत्र
विक्रेता पदाधिकारी निवड
कुरुंदवाड, ता. २७ ः शिरोळ तालुका वृत्तपत्र अंक विक्रेता व एजंट संघटनेच्या अध्यक्षपदी रायाप्पा बाळीगेरे, उपाध्यक्षपदी नागेश गायकवाड, सचिव धनंजय सावंत तर खजिनदार युवराज पाटील (मेजर) यांची बिनविरोध निवड केली.
शिरोळ तालुका वृत्तपत्र अंक विक्रेता व एजंट संघटनेच्या पदाधिकारी निवडीसाठी विशेष बैठक बोलावली होती. अध्यक्षस्थानी युवराज पाटील (मेजर) होते. अध्यक्षपदासाठी रायप्पा बाळीगेरे यांचे नाव सुचवले. उपाध्यक्षपदी नागेश गायकवाड, सचिव धनंजय सावंत, खजिनदार म्हणून युवराज पाटील यांची बिनविरोध निवड केली. तालुक्यातील वृत्तपत्र अंक विक्रेता व एजंट मारुती कोळी (निमशिरगाव), दत्तात्रय कांबळे (तमदलगे), मनोहर पाटील (कुटवाड), संजय कांबळे (कनवाड), राकेश परीट (शिरटी), प्रमोद चौगुले (अकीवाट), बजरंग नंदीकुरळे (घोसरवाड), अरविंद बेनीचीटके (नांदणी), दत्तात्रय खडके (शिरोळ), नाभिराज कबाडे ( बुबनाळ), अशोक पाटील (टाकळी), गजानन वंट्टे (गणेशवाडी), यशवंत जमखंडीकर (नृसिंहवाडी), बापू कांबळे, सुरेश पाटील, बजरंग पवार, अरुण पवार आदी उपस्थित होते.