संशोधक विद्यार्थी घडवावेत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संशोधक विद्यार्थी घडवावेत
संशोधक विद्यार्थी घडवावेत

संशोधक विद्यार्थी घडवावेत

sakal_logo
By

00517

------
संशोधक विद्यार्थी घडवावेत
डॉ. सुधा मूर्ती; कुरुंदवाड, नृसिंहवाडीला भेट
कुरुंदवाड, ता. ७ ः शिक्षण क्षेत्र सध्या डिजिटल प्रणालीद्वारे विकसित झाली आहे. त्याचा जास्तीत जास्त उपयोग विद्यार्थ्यांना करून दिला पाहिजे. जुनी व नवीन पध्दतीचा अवलंब करताना विद्यार्थी हे संशोधक रूपाने घडले पाहिजेत याकडे शिक्षकांनी अधिक लक्ष दिले पाहिजे, असे प्रतिपादन इन्फोसिसच्या माजी मुख्य कार्यकारी अधिकारी, लेखिका डॉ. सुधा मूर्ती यांनी केले.
डॉ. मुर्ती लहानपणी बरीच वर्षे कुरुंदवाड येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात कुटुंबियासह वात्सव्यास होत्या. त्यांचे पाचवीपर्यंतचे शिक्षणही कुरुंदवाड येथे झाले आहे. त्या आज (ता.७) सांगली येथील एका कार्यक्रमासाठी आल्या असता त्यांनी जिल्हा परिषदेचा दवाखाना, कुमार विद्या मंदिर क्रमांक तीनला भेट देऊन जुन्या आठवणींना उजाळा दिला. तहसिलदार डॉ. अपर्णा मोरे-धुमाळ, सहाय्यक पोलिस निरीक्षक बालाजी भांगे उपस्थित होते. पत्रकारांशी संवाद साधत बालपणीचे दिवस उलगडले. कै. शंकरराव शिंदे, श्रीमती सुशीला शहा यांची आठवण काढून त्यांच्या घरांना भेटी दिल्या. त्याकाळी डॉ. रामचंद्र कुलकर्णी यांच्याशी पोस्टाद्वारे झालेल्या पत्रव्यवहाराची पत्रे, काही आठवणीचे फोटो, त्यांच्या बंधूंचा जन्मही येथे झालेल्या फोटोंची आठवण आशा फोटोंचा अल्बम त्यांना भेट म्हणून प्रा. शरदचंद्र पराडकर यांनी दिला. कुरुंदवाड अर्बन बँकेचे अध्यक्ष अरुण आलासे, रवीकिरण गायकवाड, अजित देसाई, जे. जे. कुलकर्णी, गिरीश हुद्दार, रविकुमार पाटील आदी उपस्थित होते.

नृसिंहवाडी ः डॉ. सुधा मूर्ती यांनी आज दुपारी महापूजेवेळी दत्त चरणाचे दर्शन घेतले. नृसिंहवाडीतील जुन्या आठवणी सांगितल्या. तहसीलदार अपर्णा मोरे- धुमाळ होत्या. दत्त देवस्थानचे अध्यक्ष सदाशिव जेरे- पुजारी, विश्वस्त संजय उर्फ सोनू पुजारी, संतोष खोंबारे, वैभव पुजारी यांनी त्यांचे स्वागत केले. व त्यांना शाल, श्रीफळ, दत्त प्रतिमा व प्रसाद देऊन गौरव केला. ग्रामपंचायतीचे सदस्य अमोल विभुते, दिगंबर शंकर पुजारी, हरी गेंडे, भालू बडड, श्रीवल्लभ जेरे, दर्शन वडेर आदी उपस्थित होते.