महिल‍ा चोरट्याकडून धाडशी चोरी.१ लाख ७१ हारांचा ऐवज लंपास | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महिल‍ा चोरट्याकडून धाडशी चोरी.१ लाख ७१ हारांचा ऐवज लंपास
महिल‍ा चोरट्याकडून धाडशी चोरी.१ लाख ७१ हारांचा ऐवज लंपास

महिल‍ा चोरट्याकडून धाडशी चोरी.१ लाख ७१ हारांचा ऐवज लंपास

sakal_logo
By

औरवाड येथे घरात घुसून महिलेला लुटले

कुरुंदवाड, ता. ९ : भरदिवसा घरात घुसून दोन अज्ञात महिला चोरट्यांनी औरवाड (ता. शिरोळ) येथील रेणुका प्रवीण आळोळी (वय ३०)या महिलेच्या नाकाला रुमाल लावून बेशुद्ध करुन घरातील १ लाख ७१ हजारांचे दागिने लुटले. याप्रकरणी कुरुंदवाड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. औरवाड येथील रेणुका आळोळी यांच्या घरासमोर बुधवारी दुपारच्या सुमारास हिरव्या रंगाच्या साड्या नेसलेल्या दोन महिलांनी वहिनी म्हणून घरात हाक मारून रेणुका यांना बोलवले व पिण्यासाठी पाणी मागितले. त्या किचनमध्ये पाणी आणण्यासाठी गेल्या असता या चोरट्या महिलांनी घरात शिरुन त्यांच्या नाकावर गुंगीचे औषध मारलेला रुमाल फेकला व बेशुद्ध केले. रेणुका या बेशुद्ध झाल्यानंतर त्यांच्या अंगावरील एक तोळ्याचे सोन्याचे मणी मंगळसूत्र, एक तोळ्यांचे कानातील दोन टॉप्स, ७ ग्रॅमचे कानातील सोन्याचे वेल तर कपाटातील पितळी डब्यामध्ये ठेवलेली १० ग्रॅमच्या वेडन पिळ्याच्या दोन अंगठ्या, १२ ग्रॅमच्या लहान मुलाचे कानातील सहा रिंगा, पाच बहार वजनाचे चांदीचे पैजन, २ हजार रुपये रोख रक्कम असा १ लाख, ७१ हजार, ५०० रुपयाचा मुद्देमाल चोरुन नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.