बातमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बातमी
बातमी

बातमी

sakal_logo
By

‘आत्मनिर्भर राष्ट्रासाठी
चारित्र्यवान माणसांची गरज’

कुरुंदवाड ता. १९ : आत्मनिर्भर राष्ट्राच्या उभारणीसाठी चारित्र्यवान माणसांची देशाला अत्यंत गरज आहे. कसलीही अपेक्षा न करता काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची वानवा आहे. गावागावांत चांगले कार्यकर्ते तयार होण्यासाठी वाचनसंस्कृती महत्वाची ठरते, असे प्रतिपादन ‘डॉक्टर्स फॉर बेगर्स’ पुस्तकाचे लेखक व पुणे येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभिजीत सोनवणे यांनी केले.
येथील शिक्षण प्रसारक मंडळ व कवी मुक्तेश्वर साहित्य प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने व सांगलीतील टी. बी. लुल्ला फाउंडेशनच्या सहकार्याने वाचन सप्ताहाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सौ. अंजली कुलकर्णी होत्या. उत्कृष्ट वाचक स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिके देऊन गौरवले. डॉ. सोनवणे म्हणाले, ‘समाजात गरजूला मदत करून त्यास समाजात ताठ मानेने उभे करणे हे सत्कार्य होय.’ डॉ. सोनवणे पुणे परिसरात भिक्षेकऱ्यांची सेवासुश्रुषा करतात. त्यांना अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी गौरविले आहे. त्यांनी अनुभवकथन केले. शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रा. शरद पराडकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. सचिव सौ. सीमा जमदग्नी यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. विश्वास पाटील यांनी सूत्रसंचालन, सच्चिदानंद जंगम यांनी आभार मानले. यावेळी सुप्रसिद्ध गायिका सौ. भक्ती साळुंखे उपस्थित होत्या. त्यांच्या प्रार्थनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली.