नळयोजनेबाबत चार दिवसात बैठक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नळयोजनेबाबत चार दिवसात बैठक
नळयोजनेबाबत चार दिवसात बैठक

नळयोजनेबाबत चार दिवसात बैठक

sakal_logo
By

नळयोजनेबाबत चार दिवसात बैठक
डॉ. यड्रावकर; कुरुंदवाड पालिकेमध्ये आढाव बैठक
कुरुंदवाड, ता. २३ : शहराच्या रखडलेली नळ पाणीपुरवठा योजना मार्गी लावून कार्यान्वित करण्यासाठी ठेकेदार आणि जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांची चार दिवसात बैठक घेऊन हा प्रश्न निकाली काढणार आहे. त्याचबरोबर जुनी भाजीपाला मंडईच्या ठिकाणी सुसज्ज शॉपिंग सेंटर मॉल उभारण्यासाठी आणि सीसीटीव्हीसाठी 25 लाखांचा निधी देणार असल्याची घोषणा आमदार डॉ. राजेंद्र पाटील- यड्रावकर यांनी दिली.
कुरुंदवाड पालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. मुख्याधिकारी आशिष चौहान, माजी नगराध्यक्ष रामचंद्र डांगे, दादासाहेब पाटील आदी उपस्थित होते. श्री. यड्रावकर म्हणाले, ‘सात वर्षापासून पाणी योजना रखडली आहे. न्यायालयीन बाबी न करता सकारात्मक तोडगा काढून ही योजना मार्गी लागावी या दृष्टिकोनातून चार दिवसांत जिल्हाधिकारी राहुल रेखावार, ठेकेदार, पालिका प्रशासनाची बैठक घेऊन योजना मार्गी लावून चोवीस तास जनतेला पाणी देण्यासाठी प्रयत्न राहील.’
प्रशासक तथा मुख्याधिकारी चौहान यांनी जुनी भाजीपाला मार्केट येथे बहुमजली शॉपिंग सेंटर मॉल उभा करणे, छत्रपती शिवाजी महाराज शिवतीर्थ परिसर सुशोभीकरण करण्यासाठी लागणारा अतिरिक्त निधी, शहरात सीसीटीव्ही बसवण्यासाठी लागणाऱ्या निधीचा प्रस्ताव मांडला. सीसीटीव्हीसाठी २५ लाखाचा निधी तत्काळ देण्याची घोषणा यड्रावकर यांनी केली. उदय डांगे, अक्षय आलासे, चंद्रकांत जोंग, रमेश भुजुगडे, शरद आलासे, तानाजी आलासे आदींनी सूचना मांडल्या. सुचितोष कडाळे, अभय पाटूकले, प्रशांत पट्टेकरी, चांद कुरणे, राजू घारे, पाणीपुरवठा अभियंता प्रदीप बोरगे, पूजा पाटील आदी उपस्थित होते.