लठ्ठे यांच्या जयंतीनिमित्त सांगलीमध्ये शेती महोत्सव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लठ्ठे यांच्या जयंतीनिमित्त सांगलीमध्ये शेती महोत्सव
लठ्ठे यांच्या जयंतीनिमित्त सांगलीमध्ये शेती महोत्सव

लठ्ठे यांच्या जयंतीनिमित्त सांगलीमध्ये शेती महोत्सव

sakal_logo
By

लठ्ठे यांच्या जयंतीनिमित्त
सांगलीमध्ये शेती महोत्सव
कुरुंदवाड, ता. ४ ः दिवाणबहाद्दर आण्णासाहेब लठ्ठे यांच्या जयंतीनिमित्त ८ व ९ डिसेंबरला सांगली येथे सेंद्रिय शेती महोत्सवाचे आयोजन केल्याची माहिती महोत्सवाचे संयोजक प्रमोद चौगुले यांनी येथे पत्रकार बैठकीत दिली.
माधवनगर (सांगली) येथील डेक्कन मॅन्युफॅक्चरींग सभागृहात लठ्ठे एज्युकेशन सोसायटी संचलित कृषि तंत्रनिकेतन दत्तवाड-घोसरवाड व दिवाण बहाद्दूर लठ्ठे फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने महोत्सव होणार आहे. डॉ. भरत लट्ठे, प्रा. डी. ए. पाटील,
सुकुमार बेळके आदी उपस्थित होते.
श्री. चौगुले म्हणाले, ‘सेंद्रिय शेती कशी करावी यासाठी सेंद्रिय शेती अभ्यासक, प्राचार्य आर. एम. माने, डॉ. नितेश ओझा, निमशिरगाव, देशी गोशाळा आधारीत सेंद्रिय शेती, सेंद्रिय शेती व मातीचे महत्व या विषयावर सेंद्रिय शेतीचे शास्त्रज्ञ डॉ. सुभाषचंद्र कराळे, पारंपारिक ऊस शेती व सेंद्रिय ऊस शेती यावर कृषि विज्ञान केंद्र बारामतीचे शास्त्रज्ञ डॉ. विवेक भोईटे, सांगलीचे कृषी अधिकारी प्रकाश सूर्यवंशी यांचे व्याख्यान होणार आहे. येथे सेंद्रिय शेतीची माहिती सुलभरितीने सर्वांना मिळावी यासाठी सेंद्रिय शेतीतील उत्पादने यांचे ५० स्टॉल प्रांगणात लावले जाणार आहेत. शेती व शेतकरी समृध्द, समाज व मानव रोगमुक्त व्हावा यासाठी महोत्सवाचे आयोजन केले आहे.’