पंचगंगेत काळेकुट्ट पाणी दुर्गंधी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पंचगंगेत काळेकुट्ट पाणी दुर्गंधी
पंचगंगेत काळेकुट्ट पाणी दुर्गंधी

पंचगंगेत काळेकुट्ट पाणी दुर्गंधी

sakal_logo
By

पंचगंगा नदीत रसायनयुक्त पाणी

कुरुंदवाड ः पंचगंगा नदीत रसायनयुक्त मैलामिश्रित काळेकुट्ट पाणी मिसळले असून, पाण्याला दुर्गंधी सुटली असल्याने पंचगंगा काठच्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे. काळ्याकुट्ट पाण्यामुळे पंचगंगेची पुन्हा गटारगंगा बनण्याची शक्यता आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाने प्रदूषणास जबाबदार घटकावर वेळीच कारवाई करावी, अशी मागणी पंचगंगा प्रदूषणविरोधी समितीचे प्रमुख कार्यकर्ते विश्वास बालिघाटे यांनी केली आहे.
यंदाच्या पावसाळ्यात चांगल्या पावसामुळे पंचगंगा नदी कायम प्रवाहित राहिली होती. त्यामुळे पंचगंगा प्रदूषणाचा विसर पडला होता. सध्या पाण्याची पातळी स्थिर असून, गेल्या दोन दिवसांपासून पंचगंगेत रसायनयुक्त व मैलामिश्रित काळेकुट्ट पाणी मिसळत आहे. त्यामुळे पाण्याला उग्र वास येत असून, पाण्याला फेसही येत आहे. दूषित पाण्यामुळे पाण्यातील जलचर प्राण्यांची तडफड वाढली आहे. असेच काळेकुट्ट व मैलामिश्रित, रसायनमिश्रित पाणी मिसळत राहिल्यास जलचरांना धोका होतो. शिवाय या पाण्यावर अवलंबून शेती व पशुधनाच्या आरोग्यालाही धोका होऊ शकतो. त्यामुळे प्रदूषण नियंत्रण मंडळाने परिस्थिती आटोक्यात आहे, तोपर्यंतच कारवाई करावी, अशी मागणी बालिघाटे यांनी केली आहे.