पाच दिवस नांदून दोन वधूंचा सोन्याच्या दागिन्यांसह पोबारा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पाच दिवस नांदून दोन वधूंचा
सोन्याच्या दागिन्यांसह पोबारा
पाच दिवस नांदून दोन वधूंचा सोन्याच्या दागिन्यांसह पोबारा

पाच दिवस नांदून दोन वधूंचा सोन्याच्या दागिन्यांसह पोबारा

sakal_logo
By

पाच दिवस नांदून दोन वधूंचा
सोन्याच्या दागिन्यांसह पोबारा
कुरुंदवाडमध्ये प्रकार; नऊ जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

कुरुंदवाड, ता. २३ ः शहरातील दोन युवकांशी लग्न करून पाच दिवस नांदल्यानंतर दागिन्यांसह दोन्ही नववधूंनी पलायन केले. याची कुरुंदवाड पोलिस ठाण्यात नोंद आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन्ही नववधू, त्यांचे आईवडील आणि एजंट अशा नऊजणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात सोन्याच्या दागिन्यासह चार लाख ४० हजारांची फसवणूक झाल्याची फिर्याद अविनाश दत्तात्रय घारे (वय ३५) व विकास गणपती मोगणे (३५, दोघे रा. कुरुंदवाड) यांनी दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी ः या प्रकरणी एजंट वर्षा बजरंग जाधव (रा. सुलतानगादे, ता. खानापूर), संध्या विजय सुपणेकर (रा. माळवाडी, ता. पलूस सांगली), नवरी शारदा ज्ञानबा दवंड, ज्ञानबा रामचंद्र दवंड (रा. हडपसर, पुणे), संतोष ज्ञानदेव सुतार (रा. मदनवाडी ता. इंदापूर), जगदीश बजरंग (खानापूर, जि. सांगली), नववधू अर्चना सिद्धेश्वर वाघमारे, श्रीमती रेखा सिद्धेश्वर वाघमारे (रा. आदर्शनगर, गणपती मंदिराजवळ, विश्रांतवाडी पुणे), सुवर्णा अमोल बागल (रा. भोसरी) आदींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी सांगितले, की कुरुंदवाड येथील घारे व मोगणे यांचा विवाह जमत नव्हता. त्यांचा संपर्क एजंट वर्षा जाधव यांच्याशी आला. जाधव वधू-वर सूचक म्हणून काम करतात. तुमचं लग्न जुळविते; मात्र त्या बदल्यात पैसे द्यावे लागतील, असे त्यांनी या दोन्ही तरुणांना सांगितले. ठरल्यानुसार दोघांनी एजंट जाधव आणि उर्वरितांना पैसे दिले. दोन्ही तरुणांचा ३१ ऑक्टोबरला विवाह कुरुंदवाड येथे झाला. शारदा दवंड हिच्याशी लग्न लावून देण्यासाठी एक लाख ८० हजार रुपये घेतले. नवरी मुलीला मणी मंगळसूत्र (गंठण) व अडीच तोळ्यांचे सोन्याचे दागिने लग्नावेळी मुलाच्या कुटुंबीयांनी घातले होते. लग्नानंतर पाच दिवस शारदा दवंड नांदून माहेरी गेल्या. त्या परत आल्याच नाहीत. जाताना त्या सोन्याचे दागिने घेऊन गेल्या. या प्रकरणात दोन लाख ८० हजारांची फसवणूक झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
अन्य फिर्यादीत म्हटले आहे, की, वर्षा जाधव हिने अर्चना वाघमारेशी लग्न लावून देण्यासाठी एक लाख ६० हजार रुपये घेतले. नवरी मुलीला
सोन्या चांदीचे मणीमंगळसूत्र, पैंजण व जोडवी, असे ४० हजारांचे दागिने घातले होते. पाच दिवस नांदल्यानंतर नवरी मुलगी गेली ती परत आलीच नाही. या प्रकरणात दोन लाखांची फसवणूक झाल्याचे फिर्यादीत म्हटले आह.