आठवडी बाजार पूर्ववत जागेवर भरवा.

आठवडी बाजार पूर्ववत जागेवर भरवा.

आठवडी बाजारप्रश्नी
कुरुंदवाडमध्ये बंदचा इशारा

गुरुवारी भरणारा बाजार पूर्ववत ठिकाणी भरविण्याची मागणी

कुरुंदवाड ता.२४ः शहरात वर्षानुवर्ष गुरुवारी भरणारा आठवडी भाजीपाल्याचा बाजार बारगीर मशीद ते सरकारी दवाखानापर्यंतच्या रस्त्यावर पालिका प्रशासनाने पूर्ववत भरवावा; अन्यथा शुक्रवारपासून कुरुंदवाड शहर बेमुदत बंद करणार असल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटना, भाजप व व्यापारी असोसिएशनच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आला आहे.
याबाबत पालिकेच्या कार्यालय निरीक्षका पूजा पाटील यांना निवेदन देण्यात आले आहे. याबाबत व्यापक बैठक बोलवून योग्य तो मार्ग काढू, असे आश्वासन त्यांनी दिले आहे.
व्यापारी असोसिएशनचे अभय पाटुकले म्हणाले, ‘गुरुवारच्या आठवडी बाजारात बारगीर मशीद ते सरकारी दवाखाना, पालिका चौक ते जुने बसस्थानक या परिसरात भाजीपाल्याचा बाजार भरविण्यात येत होता. मात्र, हा भाजीपाल्याचा बाजार सन्मित्र चौक-माळभाग परिसरात हलविण्यात आला आहे. सन्मित्र चौकातून जयसिंगपूर सांगलीकडे जाणारी वाहतूक मोठ्या प्रमाणात आहे. शहरात एखादी रुग्णाला अत्यावश्यक सेवा देण्यासाठी हा रस्ता वरदान आहे. मात्र, बाजार या रस्त्यावर भरत असल्याने वाहतूक विस्कळीत होऊन या ठिकाणी अनेक अडचणी निर्माण होत आहेत.’
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अविनाश गुदले म्हणाले, ‘आठवडी भाजीपाल्याचा बाजार पुन्हा पूर्ववत आहे त्या ठिकाणी भरविल्यास व्यापारपेठेच्या व्यवसायात वाढ होणार आहे. शिवाय रस्ता खुला होऊन अत्यावश्यक सेवा देण्यासाठी सोयीचे होणार आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाने येणारा गुरुवारचा आठवडी बाजार बाजारपेठेत भरवावा; अन्यथा शुक्रवारपासून बेमुदत शहर बंद करण्यात येईल.’
यावेळी अण्णासाहेब गुदले, सुनील कुरुंदवाडे, सुदर्शन माळी, अरुण कनवडकर, अभिनंदन शहा, प्रकाश मिरजकर, लालू हुक्किरे आदींनी समस्या मांडल्या. भाजपचे राजेंद्र फल्ले, संतोष शहा, महावीर एकाटे, बाळू फल्ले, सुनील नरसिंगानी, शौकत बागवान, सचिन सातपुते, महेबूब हुकिरे आदी यावेळी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com