हिंदु जनआक्रोश मोर्चा

हिंदु जनआक्रोश मोर्चा

03316
कुरुंदवाड : शहरातील प्रमुख मार्गावरून निघालेला हिंदू-जनअक्रोश मोर्चा.
....

कुरुंदवाडमध्ये हिंदू-गर्जना जनआक्रोश मोर्चा

लव्ह जिहाद, धर्मांतरबंदी, गोहत्याबंदीकडे वेधले लक्ष

कुरुंदवाड, ता. २६ ः लव्ह जिहाद, धर्मांतरबंदी, गोहत्याबंदी या विषयांकडे लक्ष वेधण्यासाठी तालुक्यातील समस्त हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने हिंदू-गर्जना जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. हिंदू बांधव मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी झाले होते. मोर्चाच्या वतीने सहायक पोलिस निरीक्षक बालाजी भांगे यांना निवेदन देण्यात आले.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून मोर्चाला सुरुवात झाली. शहरातील दर्गा चौक, पालिका चौक, थिएटर चौक ते नवबाग मार्गावरून जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. कन्या विद्या शाळेच्या मैदानावर मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. विक्रम पावसकर, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे अध्यक्ष रावसाहेब देसाई, शिवजी व्यास, मुकेश दायमा आदी प्रमुख उपस्थित होते.
पावसकर म्हणाले, ‘देशात हिंदू माता-मुलींना लक्ष बनवून त्यांच्यावर अत्याचार करून जबरदस्तीने धर्मांतर केले जात आहे. लव्ह जिहादची प्रकरणे दिवसेंदिवस वाढत आहेत. या विरोधात राज्यभर गेल्या काही दिवसांपासून हिंदू गर्जना मोर्चे काढले जात आहेत. लव्ह जिहाद विरोधात सुरू असलेला हा संघर्ष केवळ आपला संघर्ष नसून संपूर्ण हिंदुस्थान व हिंदूंचा संघर्ष आहे. धर्माच्या रक्षणासाठी युवकांनी पुढे येणे गरजेचे आहे.’
शिवजी व्यास म्हणाले, ‘हिंदू माता भगिनींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून फसवणूक केली जात आहे. या प्रकाराला काही माफियांचे पाठबळ आहे. त्यांचा शोध घेणे गरजेचे आहे. आजचा हा संघर्ष येणाऱ्या पिढीच्या रक्षणाचे काम करेल. लव्ह जिहाद विरोधात कायदा झाल्यास आपल्या माता-भगिनींकडे डोळे वर करून पाहण्याची कोणाची हिंमत होणार नाही.’
शिवप्रतिष्ठान-हिंदुस्थानचे अध्यक्ष देसाई म्हणाले, ‘बालवयात असताना शिवरायांनी स्वराज्यातील माता-भगिनींच्यावर अत्याचार करणाऱ्यांचे हात-पाय तोडून शासन केले होते. याच महाराष्ट्रात आज हिंदू माता-भगिनींच्या संरक्षणासाठी मोर्चे काढावे लागतात ही शोकांतिका आहे.
या वेळी भगव्या टोप्या, ध्वज घेऊन जय भवानी, जय शिवाजी, जय श्रीराम, भारत माता की जय अशा जोरदार घोषणांनी शहर दणाणून सोडले होते. मोर्चासाठी दंगल नियंत्रण पथकासह दीडशेहून अधिक पोलिस व गृहरक्षक दलाचा बंदोबस्त लावण्यात आला होता.
...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com