महिलांना व्यक्त मिळणार व्यासपीठ

महिलांना व्यक्त मिळणार व्यासपीठ

महिलांना मिळणार हक्काचे व्यासपीठ
कुरुंदवाडला ‘मला बोलायचे आहे’ अंतर्गत तक्रार बॉक्सची सुविधा
कुरुंदवाड, ता. ९ ः महिलांना बोलते करायचा निर्धार येथील माऊली महिला संस्था आणि डॉ. अमरजा अमित माने यांनी केला आहे. साधारणतः महिला आपल्या समस्या, अडचणी, विचार दाबून ठेवतात. त्यामुळे त्यांची शारीरिक व मानसिक कुचंबणा होते हे लक्षात घेऊन महिलांनी व्यक्त व्हावे बोलते व्हावे यासाठी ‘मला बोलायचे आहे’ या नावाने त्यांना हक्काचे व्यासपीठ मिळणार आहे. या अंतर्गत महिलांना तक्रार बॉक्सची सुविधा करण्यात येणार आहे. माऊली संस्थेच्या संस्थापिका भाग्यश्री आडसूळ व डॉ. अमरजा माने यांनी महिलांच्या समस्यांच्या मुळाशी जाऊन या उपक्रमास आकार दिला आहे.
डॉ. माने म्हणाल्या, ‘‘खरंतर महिला कधीच स्वतःच मत कधीच मांडत नाहीत. त्यांच्या अपुऱ्या राहिलेल्या इच्छा, त्यांच्या आरोग्याविषयी असणाऱ्या समस्या तर त्या कधीच स्वतःहून सांगत नाहीत. त्यामुळे त्यांच्या जीवनात अनेक प्रश्न निर्माण होतात. त्यामुळे महिलांना समजून घ्यायची वेळ आली आहे. त्या पुढे येत नाहीत तर त्यांच्यासाठी हा बॉक्स त्यांना नेहमी मदत करेल.’’ सौ. आडसूळ म्हणाल्या, ‘‘महिलांसाठी मला बोलायचं आहे हा बॉक्स दिशा देण्याचे काम करेल.’’
‘मला बोलायचे आहे’ असा बॉक्स डॉ. माने यांच्या नवजीवन हॉस्पिटलमध्ये व श्री दत्त मंदिर येथे बसवण्यात येणार आहे. बॉक्समध्ये ज्या महिलेची चिठ्ठी असेल त्या महिलेचे नाव गुपित ठेऊन तिची समस्या सोडण्यात येणार आहे. तसेच त्या महिलेचे नाव कोणालाच कळणार नाही याची दक्षता घेण्यात येणार आहे. त्यामुळे महिलांनी बिनधास्तपणे तुम्हाला होणाऱ्या त्रासाबद्दल किंवा अडचणीबाबत बॉक्समध्ये चिठ्ठी टाकून माहिती द्यावी. समस्या आणि अडचणी सोडवण्यासाठी कटिबद्ध आहोत, असे डॉ. अमरजा माने यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com