Wed, June 7, 2023

प्रा.आशुतोष आंबी यांना पी.एच.डी
प्रा.आशुतोष आंबी यांना पी.एच.डी
Published on : 10 March 2023, 4:16 am
03327
आशुतोष आंबी
यांना पीएच. डी.
कुरुंदवाड ः येथील प्रा. आशुतोष आंबी यांना शिवाजी विद्यापीठाची पीएच. डी. मिळाली आहे. ‘एकॉलॉजी अॅण्ड बारकोडींग ऑफ ब्राकॉनिडस फ्रोम वेस्टर्न महाराष्ट्र’ या विषयावर त्यांनी प्रबंध सादर केला होता. त्यांना प्रोफेसर डॉ. टी. व्ही. साठे, प्राणीशास्त्र विभाग, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांनी मार्गदर्शन केले. ब्राकॉनिडस या कीटकांचा जैविक कीड नियंत्रणात खूप मोठा वाटा आहे. ब्राकॉनिडस या कीटकांची योग्य ओळख होणे गरजेचे आहे. ब्राकॉनिडस या कीटकांची योग्य ओळख न झाल्याने अनेक जैविक कीड नियंत्रणाचे प्रयत्न अयशस्वी झाले आहेत. ब्राकॉनिडस या कीटकांची विविधता, परिस्थितीकीचा अभ्यास व डीएनए बारकोडींगच्या सहाय्याने योग्य ओळख केल्याने जैविक कीड नियंत्रण सोपे होणार आहे.