अतिक्रमण हटाव अकिवाट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अतिक्रमण हटाव अकिवाट
अतिक्रमण हटाव अकिवाट

अतिक्रमण हटाव अकिवाट

sakal_logo
By

03371
अकिवाट (ता. शिरोळ) ः येथील गायरानातील अतिक्रमण हटविण्यात आले.

अकिवाटमधील गायरानातील अतिक्रमण हटविली
औद्योगिक वसाहतीसाठी महसूल विभागाकडून ९० एकरावरील क्षेत्र ताब्यात

कुरुंदवाड ता.२८ ःअकिवाट, सैनिक टाकळी (ता.शिरोळ) येथील गायरान जमिनीवर औद्योगिक वसाहत उभी करण्याचा राज्य शासनाने निर्णय घेतला आहे. त्यासाठी भूसंपादन करण्यासाठी गायरान जमिनीवरील अतिक्रमण हटविण्याची मोहीम प्रशासनाने आजपासून सुरू केली. पहिल्या दिवशी अकिवाट हद्दीतील नव्वदव एकरावरील अतिक्रमित गायरान शेतीचे क्षेत्र महसूल विभागाने पोलिस बंदोबस्तात ताब्यात घेतले. उद्या (ता.२९)पासून सैनिक टाकळी येथील जमीन ताब्यात घेण्याची मोहीम सुरू होणार असल्याचे महसूल विभागाने सांगितले.
दरम्यान, या क्षेत्रात वर्षानुवर्ष शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसमोरच उभ्या पीकावर जेसीबी फिरवण्यात येत होता. मात्र, अतिक्रमित क्षेत्र असल्याने शेतकरी हताशपणे उभा होते. अनेक शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू तरळत होते.
तहसीलदार अपर्णा मोरे, गटविकास अधिकारी शंकर कवितके, तालुका नगर भूमी अधीक्षक प्रियांका मेंडके, ग्रामविकास अधिकारी नंदकुमार निर्मळ, मंडळ अधिकारी चंद्रकांत काळगे, दहा ग्रामसेवक तलाठी यांच्यासह पोलिस निरीक्षक बालाजी भांगे, उपनिरीक्षक अमित पाटील, विजय घाटगे यांच्यासह शंभरहून अधिक पोलिसांचा बंदोबस्त यावेळी होता.
दरम्यान आंदोलन अंकुशचे दीपक पाटील यांनी
काही शेतकऱ्यांनी मुंबई उच्च न्यायालयाने एप्रिल 2023 पर्यंत अतिक्रमण हटाव मोहिमेला स्थगिती दिल्याचे परिपत्रक दाखवत मोहीम रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, गटविकास अधिकारी शंकर कवितके यांनी जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार आम्ही कामकाज करत आहोत. याबाबत आपण त्यांच्याकडे दाद मागावी, शासकीय कामात अडथळा करू नये असे सांगत मोहीम सुरू ठेवली.
अकिवाट येथील गट क्र.९२६ मधील १८ हेक्टर गायरान जमिनीवर ७५ शेतकऱ्यांनी शेतीचे अतिक्रमण केले आहे, तर सैनिक टाकळी येथील गट क्र.१३५०, ११९४, ११८० या १५ हेक्टर गायरान जमिनीमध्ये अतिक्रमण आहे. अकिवाट गायरान जमिनीतील १३ शेतकऱ्यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्याने सहा हेक्टर शेत जमिन वगळता बारा हेक्टर शेतीचा ताबा घेण्यासाठी तालुका नगर भूमी अधीक्षक कार्यालयामार्फत हद्दी निश्चित केल्या आहेत. या हद्दीनुसार महसूल प्रशासनाने ९०एकर शेत जमीन महसूल प्रशासनाने ताब्यात घेतली आहे. बुधवारपासून सैनिक टाकळी येथील १५हेक्टर शेत जमीन ताब्यात घेण्याची मोहीम सुरू होणार आहे.
आंदोलन अंकुशचे दीपक पाटील यांनी शेत जमिनीवरील औदयोगिक प्रयोजनासाठी अतिक्रमण हटवणे हा शेतकऱ्यावर अन्याय आहे. हा मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान करणारा प्रकार आहे. याबाबत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांना घेऊन मुंबई उच्च न्यायालयात अवामान याचिका दाखल करण्याचा इशारा दिला.