कुरुंदवाडला बसवेश्वरांना अभिवादन

कुरुंदवाडला बसवेश्वरांना अभिवादन

कुरुंदवाडला बसवेश्वरांना अभिवादन
कुरुंदवाड ः शहर व परिसरात महात्मा बसवेश्वर जयंती उत्साहात साजरी केली. सकाळी कल्लेश्वर मंदिरात कल्लेश्वर पिंडीवर महाभिषेक घातला. महात्मा बसवेश्वर मुर्तीचे पुजन केले. त्यानंतर महात्मा बसवेश्वर चौकाचे पुजन सदाशिव सुभेदार, अण्णासाहेब जामदार यांच्याहस्ते केले. सदाशिव मगदूम, प्रा. चंद्रकांत मोरे, सुरेश माळी आदी उपस्थित होते. महात्मा बसवण्णा सामाजिक सेवा प्रतिष्ठानच्या दहाव्या वर्धापनदिनानिमित्त लाडुचे वाटप केले. कल्लेश्वर मंदिर येथे श्री अक्कमहादेवी महिला भजनी मंडळामार्फत बसव जन्मोत्सव साजरा केला.
----------
कुंभोजमध्ये प्रतिमा पूजन
कुंभोज ः येथील लिंगायत समाजातर्फे महात्‍मा बसवेश्‍वर जयंती साजरी केली. सकाळी बसवेश्‍वर प्रतिमेचे पुजन केले. समस्‍त मुस्‍लिम समाजातर्फे प्रतिमेस पुष्‍पहार अर्पण केला. श्रीकांत माळी, महेश माळी, जंबा माळी आदी उपस्थित होते.
-------------
कबनूरमध्ये मिरवणूक
कबनूर ः येथील वीरशैव लिंगायत समाज यांच्यावतीने भक्तिमय वातावरणात, पारंपारिक पद्धतीने महात्मा बसवेश्वर जयंती उत्साहात साजरी केली. लिंगायत समाजातील सर्वच पोट जातीचा उल्लेखनीय सहभाग होता. लिंगायत समाजाचे अध्यक्ष अशोक पाटील यांनी बसव ज्योतीचे स्वागत केले. दुपारी बारा वाजता राजू पाटील व सतीश पाटील दांपत्यानी समाजातील महिलांनी बसवेश्वरांचा जन्मकाळ साजरा केला. आप्पासो पाटील (नागोंडमळा) पिनगोंड पाटील यांच्याहस्ते उत्सव पालखीचे पूजन केले. पंचगंगा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष पी. एम. पाटील, सुधाकरराव मणेरे, बी. डी. पाटील, मिलिंद कोले आदींच्या उपस्थितीत मिरवणूकीला प्रारंभ झाला. कल्लेश्वर मंदिरात दिलीप पाटील यांच्या हस्ते अभिषेक घातला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com