कुरुंदवाडमधील संवेदनशील भागात रुट मार्च

कुरुंदवाडमधील संवेदनशील भागात रुट मार्च

03482
कुरुंदवाड ः शहरातून पोलिसांनी रूट मार्च काढला.
----------
कुरुंदवाडमधील संवेदनशील भागात रुट मार्च
उरूस, यात्रा, सणांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून खबरदारी
कुरुंदवाड, ता. ९ ः येथील पोलिस ठाणे कार्यक्षेत्रातील शहरी आणि ग्रामीण भागात उरूस, जत्रा, यात्रा आणि धार्मिक सणांच्या कालावधीत कोणताही अनुचित घटना घडू नये. शांतता, सुव्यवस्था कायम रहावी, या उद्देशाने येथील पोलिस ठाण्याच्या रॅपिड ॲक्शन फोर्सतर्फे नागरिकांकडून गावातील स्थिती जाणून घेत शहरातील संवेदनशील भागात रूट मार्च काढला. 
कुरुंदवाड पोलिस ठाणे व कोल्हापूर जिल्हा राखीव पोलिस दल आणि गृह रक्षक दलाच्या जवान रुटमार्चमध्ये सहभागी झाले. त्याचे नेतृत्व सहायक पोलिस निरीक्षक बालाजी भांगे, उपनिरीक्षक अमित पाटील, विजय घाटगे यांनी केले. कुरुंदवाड पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात शहरी व ग्रामीण भागातील उरूस जत्रा यात्रेत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी उपविभागीय पोलिस अधिकारी रामेश्वर वैंजने यांच्या मार्गदर्शनाखाली ठिकठिकाणी बंदोबस्त लावला आहे. प्रत्येक गावामध्ये शांतता कमिटीच्या बैठका घेऊन अनुचित प्रकाराला आळा घालण्यासाठी नागरिक व ग्रामस्थांनी पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहन करत त्याचाच एक भाग म्हणून शहरातील मुख्य रस्त्यांवर पथसंचालन करून दर्गा चौक, सन्मित्र चौक माळभाग, बागवान गल्ली, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, नगरपालिका चौक ते पोलिस ठाण्यापर्यंत रुटमार्चने मार्गक्रमण केले. पोलिस कॉन्स्टेबल अरुण वटारे, अमित प्रधान, अनिल चव्हाण, शहाजी फोंडे, राजेंद्र पवार, अरुण नागरगोजे, शकील कुलकर्णी, चंद्रकांत मोरे, मोहसीन कुलकर्णी यांच्यासह पोलिस दलाच्या ४५ कर्मचाऱ्यांसह शीघ्र कृती दलाचे ३८ जवान व गृहरक्षक दलाचे जवान सहभागी झाले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com