१७ कोटी ७७ लाखांचे अंदाजपत्रक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

१७ कोटी ७७ लाखांचे अंदाजपत्रक
१७ कोटी ७७ लाखांचे अंदाजपत्रक

१७ कोटी ७७ लाखांचे अंदाजपत्रक

sakal_logo
By

१७ कोटी ७७ लाखांचे अंदाजपत्रक
कुरुंदवाड पालिका; प्रथमच प्रशासकांकडून मंजुरी
कुरुंदवाड, ता. ९ ः येथील पालिकेचा २०२३-२४ चा १७ कोटी ७७ लाख ५७ हजारांचा अंदाजपत्रक सादर केला. पालिका प्रशासक तथा मुख्याधिकारी आशिष चौहान यांनी त्याला मंजुरी दिली. पालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच प्रशासकाने अंदाजपत्रक मंजूर केले आहे.
दीड वर्षापासून पालिकेवर प्रशासक राज असून मुख्याधिकारी यांच्याकडेच प्रशासकपदाचा कार्यभार आहे. त्यामुळे प्रशासक कोणती नवीन तरतूद करतात. नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न होणार का, याची चर्चा होती. त्यामुळे कुरुंदवाडकरांचे पालिकेच्या अंदाजपत्रकाकडे लक्ष होते.
२०२२-२३ चा वार्षिक अंदाजपत्रक तयार करुन विशेष अंदाजपत्रकीय सभा घेतली. यामध्ये २०२१-२२ च्या जमाखर्चाचा तपशील तपासला. २०२२-२३ चा वार्षिक अंदाजपत्रक संक्षिप्त स्वरूपात मांडले. प्रशासक तथा मुख्याधिकारी चौहान यांनी अंदाजपत्रकास किरकोळ बदलासह मान्यता देत पुढील मान्यतेसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवल्याचे सांगितले.
---------
* अपेक्षित उत्पन्न
प्रशासनाने उत्पन्नाची बाजू मांडताना कर महसूल २ कोटी ६३ लाख २७ हजार रुपयांबरोबरच विविध विभागातून ६३ कोटी ६९ लाख ५९ हजार ९४३ रुपयांचे उत्पन्न अपेक्षित आहे.

*अपेक्षित खर्च
पालिकेच्यावतीने खर्चाची बाजू मांडताना आस्थापना खर्च ५ कोटी ७६ लाख ५६ हजार ४४० रुपयांबरोबरच महसुली अनुदाने, अंशदाने आणि अर्थसाहाय्य तरतुदी आणि निर्लेखित करणे, स्थीर व जंगम मालमत्ता, इतर दायित्वे अशी एकूण ४५ कोटी ९२ लाख २ हजार २४० रुपये खर्च अपेक्षित आहे.

*करवाढ नाही*
पूर्वीच्या सत्ताधाऱ्यांनी मागील वर्षी कोणतीही कर वाढ केली नाही. यावर्षी नगरपालिकेवर प्रशासक असल्यामुळे यावर्षीच्या अंदाजपत्रकात नवीन काय काय तरतूद करण्यात येते याकडे लक्ष लागले होते. मात्र प्रशासनाने कोणतीही करवाढ केली नाही.