अतिक्रमणधारक आक्रोश मेळावा

अतिक्रमणधारक आक्रोश मेळावा

03490

व्यापक लढा उभारल्यास यश
डॉ. सुरेश माने; कुरुंदवाडला गायरान अतिक्रमणधारकांचा मेळावा

कुरुंदवाड, ता. १३ ः राज्यातील साडेपाच लाख कुटुंबे अनेक वर्षांपासून गायरान जमिनीवर रहिवास करत आहेत. या कुटुंबांचे अतिक्रमण नियमितीकरण करून केंद्र सरकारच्या ‘सर्वांना घरे’ योजनेंतर्गत राज्य सरकारने त्यांना मालकी हक्क द्यावा, यासाठी न्यायालयीन लढाई सुरू आहे. जिल्ह्यातील अतिक्रमणधारकांनी हा लढा व्यापक केल्यास लवकर यश मिळेल, असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयातील डॉ. सुरेश माने यांनी केले.
शिरोळ तालुक्यातील गायरान जमिनीवरील रहिवासी आणि व्यावसायिक अतिक्रमण हटवण्यासाठी तहसीलदार कार्यालयाने नोटिसा लागू केल्या आहेत. याविरुद्ध न्यायालयीन लढा उभारण्यासाठी आक्रोश मेळावा झाला. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी दिलीप माने होते. राज्य गायरान हक्क अभियानचे प्रदेशाध्यक्ष सुभाष मुंढे, माजी खासदार राजू शेट्टी, अतिक्रमण बचाव संघर्ष कृती समितीचे अध्यक्ष पांडुरंग गायकवाड प्रमुख उपस्थित होते.
सुभाष मुंढे म्हणाले, ‘राज्य शासनाने गोरगरीबांच्या निवाऱ्याच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करून चेंडू न्यायालयात फेकला आहे. भूमिहिनांच्या हक्काची जमीन हिसकावून न घेता त्यांचे आहे तेथेच नियमितीकरणासाठी मुंबईतील आझाद मैदानात मोर्चा काढण्यात येणार आहे. मोर्चाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे.’
राजू शेट्टी म्हणाले, ‘मोठे उद्योजक सरकार आणि नेतेमंडळींना हाताशी धरून गोरगरिबांच्या जमिनी काढून घेऊन यांना बेघर करण्याचा घाट रचला आहे. मात्र घाबरू नका. न्यायालयीन लढ्यासाठी सर्वतोपरी मदत देऊ.’
१७ मे रोजी शिरोळ तहसील कार्यालयात हरकती अर्ज दाखल करण्यात येणार आहेत. त्यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले. यावेळी दगडू माने, भाऊसाहेब कसबे, विश्वास बालीघाटे, ॲड. बी. आर. कुंभार, दिगंबर सकट, सुरेश सासणे, आप्पासाहेब बंडगर, आक्काताई तेली, अमोल माने, संजय कांबळे, मियाँखान मोकाशी आदींनी भाषणे केली. यावेळी अमोल मोहिते, राजू गावडे, बाबूराव कांबळे, नारायण गायकवाड, ज्ञानदेव नरळे, पांडुसिंग रजपूत, वैभव गोरे, बादशहा बागसर, बाबाशा मकानदार, शानाबाई जाधव, सुमन चव्हाण, शमशुद्दीन मुल्लाणींसह अकिवाट, सैनिक टाकळी, टाकळीवाडी, चिपरी, तेरवाड, शिरढोण, निमशिरगाव, हेरवाड, उदगावसह शिरोळ तालुक्यातील अतिक्रमणधारक उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com