उन्हाळ्यात राजापूर बंधारा ओव्हर फ्लो

उन्हाळ्यात राजापूर बंधारा ओव्हर फ्लो

03494
राजापूर (ता. शिरोळ) ः येथील कृष्णा नदीवरील बंधारा चक्क उन्हाळ्यात पाण्याखाली गेला आहे. (छायाचित्र ः अनिल केरीपाळे)
---------------
उन्हाळ्यात राजापूर बंधारा ओव्हर फ्लो
तीन हजार क्यूसेक्सने विसर्ग; कर्नाटक राज्याला होणार लाभ
कुरुंदवाड, ता. १४ ः राजापूर (ता. शिरोळ) येथील कृष्णानदीवरील बंधारा चक्क उन्हाळ्यात ओव्हर फ्लो होवून पाण्याखाली गेला. बंधाऱ्‍यावरुन धबधब्यासारखे पाणी कर्नाटकच्या दिशेने पडत आहे. या पाण्याचा कर्नाटकला लाभ होणार आहे. शनिवारी मध्यरात्री बंधारा पाण्याखाली गेला आहे.
बंधाऱ्‍यातून अंदाजे तीन हजार क्यूसेक्सने पाण्याचा कर्नाटक राज्याकडे ओव्हर-फ्लोचा विसर्ग सुरू असून कर्नाटक राज्याला अतिरिक्त एक टीएमसी जादा पाण्याचा साठा विसर्ग झाला आहे. सध्या बंधाऱ्याची पाणी पातळी साडेसोळा फूट झाली आहे. टेंभू ताकारी योजनेतून पाण्याचा उपसा न झाल्याने बंधारा ओव्हर फ्लो झाल्याची शक्यता पाटबंधारे विभागाने वर्तवली आहे.
कर्नाटकच्या मागणीवरुन याच महिन्यात कृष्णेतून एक टीएमसी पाणी राजापूर बंधाऱ्‍यातून दिले आहे. आठवड्यापूर्वीच एक टीएमसी पाण्याचा कोटा पूर्ण झाला आहे. त्यानंतर जलसंपदा विभागाने बंधाऱ्याचे सर्व बरगे घालून पाण्याचा विसर्ग बंद करुन विसर्ग थांबवला. सध्या नदी तुडुंब आहे. बंधारा ओव्हर फ्लो होऊन दरवाजावरून पाणी वाहत होते. पाण्याच्या दाबाने काही दरवाज्याचे बर्गे तुटून गेले आहेत. कोयना धरणात भरपूर जलसाठा असल्याने राजापूर बंधाऱ्यापर्यंत कृष्णा नदी आणि तेरवाड बंधाऱ्यापर्यंत पंचगंगा नदीत बॅकवॉटरने पाणी देण्याच्या दृष्टिकोनातून नियोजन केले आहे. टेंभू आणि ताकारी योजनेलाही बॅक वॉटरद्वारे पाण्याचा उपसा केला जातो. दोन दिवस सांगली जिल्ह्यात वादळी पावसाने धुमाकूळ घातल्याने पाण्याचा उपसा न झाल्याने राजापूर बंधाऱ्याची साडेसोळा फूट पाण्याची लेवल होऊन बंधारा ओव्हरफ्लो झाला आहे. बंधाऱ्‍यावरून पाणी वाहू लागले आहे. पावसाळ्यातच बंधारा पाण्याखाली असतो. मात्र यंदा प्रथमच उन्हाळ्यात बंधारा पाण्याखाली गेला आहे.
---------
गेटची आवश्यकता
बंधाऱ्यावरून पाणी वाहत असताना काही ग्रामस्थ व वाहनधारक बंधाऱ्यावरून जीवघेणा ये-जा प्रवास करत होते. पाटबंधारे विभागाच्या कर्मचाऱ्यांनी बंधाऱ्‍यावर जाऊ नका असे सांगत असताना काहींनी त्यांच्याशी हुज्जत घालत प्रवास केला. त्यामुळे बंधाऱ्याच्या दोन्ही बाजूला गेट करण्याची आवश्यकता आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com