महाराणा प्रतापसिंह यांना अभिवादन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महाराणा प्रतापसिंह यांना अभिवादन
महाराणा प्रतापसिंह यांना अभिवादन

महाराणा प्रतापसिंह यांना अभिवादन

sakal_logo
By

03509
कुरुंदवाड ः येथील महाराणा प्रतापसिंह उद्यानातील कार्यक्रमात आशिष चौहान यांनी मार्गदर्शन केले. यावेळी समाजबांधव उपस्थित होते.
--------
महाराणा प्रतापसिंह यांना अभिवादन
कुरुंदवाड, ता. २२ ः स्वाभिमानी आणि महापराक्रमी योद्धा म्हणून महाराणा प्रतापांची ओळख आहे. त्यांनी मातृभूमीसाठी लढताना पराकोटीचा स्वाभीमान जपला. त्यासाठी प्राणही पणाला लावले. त्यांचा हा पराक्रम आजच्या घडीला निश्चितच प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन पालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक आशिष चौहान यांनी केले
येथील महाराणा प्रतापसिंह उद्यान येथे वीर शिरोमणी श्री महाराणा प्रतापसिंह यांच्या जयंतीनिमित्त महाराणा प्रतापसिंह यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी रजपूत समाजाचे अध्यक्ष उदयसिंग रजपूत होते. मान्यवरांच्या हस्ते परिसरात वृक्षारोपण केले. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या गुणवंतांचा व महाराष्ट्र पोलिस दलात नियुक्ती झालेल्या युवकांचा सत्कार केला. वृद्धाश्रमात फळे वाटप केली. दिलीप बंडगर, किशोर रजपूत, संजय रजपूत, संतोष रजपूत, विजय बंडगर, संजय ढाले आदी उपस्थित होते. स्वागत व प्रास्ताविक राजसिंह रजपूत यांनी केले. येथील पालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात प्रतिमेला पालिकेचे अभियंता प्रणाम शिंदे यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. रिजवान मतवाल, निशिकांत ढाले, अमोल कांबळे आदी उपस्थित होते.