Mon, Sept 25, 2023

घागर मोर्चा, ठिय्या आंदोलनाचा इशारा
घागर मोर्चा, ठिय्या आंदोलनाचा इशारा
Published on : 22 May 2023, 1:13 am
घागर मोर्चा, ठिय्या आंदोलनाचा इशारा
कुरुंदवाड ः शहरातील मोमीन गल्लीत कमी दाबाने पाणीपुरवठा होत असून धार्मिक स्थळा समोरील गटार उघड्यावर पडली आहे. येथे पाईप घालून गटार बंदिस्त करावी अशी मागणी दीड वर्षापासून सुरू सुरू आहे. मात्र पालिका प्रशासन त्याबाबत कारवाई करीत नाही. त्यामुळे मोमीन गल्लीचा विसर पडला आहे काय असा असा आरोप सामाजिक कार्यकर्ते कुदरत भुसारी यांनी करीत या समस्येबाबत पालिका प्रशासनाने आठ दिवसांत कारवाई न केल्यास पालिकेवर घागर मोर्चा व ठिय्या आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला आहे. यावेळी मोहसीन गरगरे, अक्रम बागवान, राजू अत्तार, दस्तगीर फकीर, रफिक गोलंदाज, जवान मोमीन, असलम गोलंदाज, बादशाह पैलवान आदी उपस्थित होते.