ऊसतोडणी मुकादम फसवणूक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ऊसतोडणी मुकादम फसवणूक
ऊसतोडणी मुकादम फसवणूक

ऊसतोडणी मुकादम फसवणूक

sakal_logo
By

कुरुंदवाडमध्ये सहा ऊसतोड
मुकादमांविरुद्ध गुन्हा दाखल
कुरुंदवाड ता.२३ ः ऊस तोडणीसाठी मजूर देण्याचे आमिष दाखवून गंडा घातल्याप्रकरणी सहा ऊसतोड मुकादमांविरुद्ध कुरुंदवाड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या मुकादमांनी ६२ लाखांची फसवणूक केल्याचे पुढे आले आहे. आजअखेर ८५ हून अधिक शेतकऱ्यांनी फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यासाठी नोंदणी केल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी भांगे यांनी दिली.
कुरुंदवाड पोलिस ठाण्यात शिरोळ तालुक्यातील प्रदीप रमेश पाटील(रा.राजापूर),गणपती मारुती पाणदारे( रा. शिरढोण),शीतल जयपाल पाटील (रा.अकिवाट),परसू नाना धनगर(रा.नवे दानवाड),धोंडिराम सत्याप्पा कोरूचे(रा.हेरवाड),राजेंद्र भिमू आलासे(रा.हेरवाड) या सहा शेतकऱ्यांनी फिर्याद दिली आहे. याप्रकरणी संशयित आरोपी विठ्ठल अभिमान(रा.गोडाळा,ता.शेणगांव),दिलीप तुकाराम जाधव (रा.पिंपळनेर,ता. बीड, जि.बीड),गुलाब दशरथ लेंगरे (रा.हन्नूर रेवेवाडी ता.मंगळवेढा, जि. सोलापूर),सीताराम कानीराम चव्हाण (रा.बामणी कुन्हाडी, ता.जिन्तूर, जि.परभणी),विनोद गोवर्धन जाधव(रा.भरसावंगी तांडा,जि.हिंगोली),संतोष गणपती चव्हाण(रा.सोमनाथपूर ता.उदगिर, जि लातूर)यांच्याविरुद्ध येथील पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.