पान ७ स पटा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पान ७ स पटा
पान ७ स पटा

पान ७ स पटा

sakal_logo
By

1836
कसबा तारळे (ता. राधानगरी) : येथे देवी विठ्ठलाईच्या नवरात्रोत्सवानिमित्त मंदिरात सुरू असलेले सजावटीचे काम (राजू कुलकर्णी : सकाळ छायाचित्रसेवा)

विठ्ठलाई नवरात्रोत्सवाची
कसबा तारळेत तयारी पूर्ण
कसबा तारळे : येथील विठ्ठलाई कला, क्रीडा व सांस्कृतिक तरुण मंडळातर्फे श्री विठ्ठलाईचा नवरात्रोत्सव दरवर्षीप्रमाणे साजरा होणार असून, त्यासाठीच्या तयारीला वेग आला आहे. मंदिर परिसरात विद्युत रोषणाईसह सजावटीची कामे पूर्ण झाली असून, बुधवारपासून (ता.२८) रात्री मंदिरासमोर सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. दरम्यान, गैबी-विठ्ठलाई खेळे मंडळातर्फे देवीचे रोजचे पूजाविधी होतील. रोज सायंकाळी ७ वाजता आरती होईल.
विठ्ठलाई तरुण मंडळाचे अध्यक्ष अनिकेत शिपेकर, गणेश पाटील, तरुण पाटील म्हणाले, ‘बुधवारी संभाजी यादव यांचा ''हसण्यासाठी जगा आणि जगण्यासाठी हसा’, गुरुवारी भैरवनाथ सोंगी भजनी मंडळ, सोन्याची शिरोली यांचा ‘गजर सोंगांचा जागर लोककलेचा,’ शुक्रवारी महिलांसाठी हळदी-कुंकूबरोबरच होम मिनिस्टर स्पर्धा होतील. शनिवारी स्थानिक विद्यार्थ्यांच्या कला महोत्सव होणार असून, रविवारी रात्री रस्सीखेच स्पर्धा होईल. मंडळाच्या कलाकारांकडून पावनखिंड हा ऐतिहासिक सजीव देखावा मंगळवारी सादर होणार आहे.

उचगावमध्ये आजपासून
मंगेश्वरचा नवरात्र उत्सव
गांधीनगर : उचगाव (ता. करवीर) येथील ग्रामदैवत मंगेश्वर देवाचा नवरात्र उत्सवाला सुरुवात होत असून, मंगेश्वर नवरात्र उत्सव समितीतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. सोमवार (ता.२६) सद्‌गुरू सेवा माऊली भजनी मंडळ यांचे भजन, मंगळवार (ता २७) रोजी ब्रह्मनाथ सोंगी भजन मंडळातर्फे सोंगी भजन,
बुधवार (ता.२८)सीमा सुनील पाटील यांचे प्रवचन, गुरुवार (ता. २९) सर्जेराव पाटील देवमामा रेणुका जागर पार्टी यांचा रेणुका जागर कार्यक्रम शुक्रवार( ता. ३०) रोजी स्वामी समर्थ भजनी मंडळ यांचा भजनाचा कार्यक्रम, १ ऑक्टोबर रोजी नरेंद्र महाराज महिला भजनी मंडळ यांचा भजनाचा कार्यक्रम, ता. २ रोजी त्रिमूर्ती भक्त मंडळ भजनाचा कार्यक्रम, ३ रोजी रायझिंग स्टार प्रस्तुत अंधकलाकारांचा ऑर्केस्ट्रा होणार आहे. कार्यक्रम मंगेश्वर मंदिर परिसरात रात्री साडेनऊ वाजता होतील.