कसबा तारळे येथे श्री विठ्ठलाई नवरात्रोत्सवानिमित्त कुंकुमार्चन सोहळा संपन्न | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कसबा तारळे येथे श्री विठ्ठलाई नवरात्रोत्सवानिमित्त कुंकुमार्चन सोहळा संपन्न
कसबा तारळे येथे श्री विठ्ठलाई नवरात्रोत्सवानिमित्त कुंकुमार्चन सोहळा संपन्न

कसबा तारळे येथे श्री विठ्ठलाई नवरात्रोत्सवानिमित्त कुंकुमार्चन सोहळा संपन्न

sakal_logo
By

01886

कसबा तारळेत कुंकुमार्चन सोहळा
कसबा तारळे, ता. ३ : येथील देवी श्री विठ्ठलाई नवरात्रोत्सवात आठव्या माळेच्या निमित्ताने आज सकाळी कुंकुमार्चन सोहळा झाला.
श्री विठ्ठलाई तरुण मंडळ व श्री गैबी-विठ्ठलाई खेळे मंडळाने आयोजन केले होते. मंदिरासमोर उभारलेल्या मंडपामध्ये सकाळी दीड तास हा सोहळा झाला. समीर गुळवणी यांनी पौरोहित्य केले.सविता धोंडीराम कामत व साधना नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली श्री गणेश स्तोत्र, सप्तशती पठण व श्री विठ्ठलाईदेवी नामजप करण्यात आला. परिणामी संपूर्ण मंदिर परिसर भक्तिमय झाला. उपस्थित महिलांसाठी उपवासाचा फराळ खेळे मंडळाचे सदस्य असलेल्या कामत परिवारातर्फे देण्यात आला. भोगटे परिवारातर्फे केळीचे वाटप करण्यात आले.
दरम्यान, देवीच्या गाभाऱ्याची सलग सात वर्षे स्वच्छता करणारे खेळे मंडळाचे सदस्य चंद्रकांत तुकाराम पाटील यांचा सत्कार करण्यात आला. प्रथमच आयोजित केलेल्या या सोहळ्याच्या तयारीसाठी श्री विठ्ठलाई तरूण मंडळ व खेळे मंडळाच्या सहकाऱ्यांसह प्रियांका राजेश पाटील, मेघा रवींद्र गुंजन, कल्याणी रवींद्र कांबळे, मनिषा संदीप पाटील, निलम बंडोपंत सायेकर, वंदना सुनील वणकुद्रे, रंजना दिनकर जोशी, अश्विनी विश्वास पानारी, संचिता सचिन रामसिंग, शिवानी समीर गुळवणी, शांताबाई जिवबा कांबळे, अपर्णा आशोक साबळे, संगिता उत्तम लोकरे, साताबाई अनिल सुर्यवंशी तसेच सायेकर बंधू आदींनी परिश्रम घेतले.