चार स्पर्धा परीक्षांमध्ये लख्ख यश : गुडाळची नीता ठरतेय विद्यार्थ्यांचे प्रेरणास्थान ! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चार स्पर्धा परीक्षांमध्ये लख्ख यश : गुडाळची नीता ठरतेय विद्यार्थ्यांचे प्रेरणास्थान !
चार स्पर्धा परीक्षांमध्ये लख्ख यश : गुडाळची नीता ठरतेय विद्यार्थ्यांचे प्रेरणास्थान !

चार स्पर्धा परीक्षांमध्ये लख्ख यश : गुडाळची नीता ठरतेय विद्यार्थ्यांचे प्रेरणास्थान !

sakal_logo
By

01836
पुणे : स्पर्धा परीक्षेतील यशाबद्दल नीता पाटील हिचा सत्कार करताना कार्यालयातील सहकारी.

गुडाळच्या नीताचा
स्पर्धा परीक्षेत चौकार

दोन वर्षांतच चार परीक्षा उत्तीर्ण

कसबा तारळे, ता. ३ : स्पर्धा परीक्षेतील यशासाठी विद्यार्थी दहा-बारा वर्षे अभ्यासात झोकून देतात. असे असताना राधानगरी तालुक्यातील गुडाळसारख्या ग्रामीण भागात प्राथमिक व माध्यमिक शिक्षण घेतलेल्या नीता चंद्रकांत पाटील हिने एका वर्षात चक्क तीन व दुसऱ्या वर्षात एक अशा चार जागांवर लख्ख यश मिळविले. स्पर्धा परीक्षांच्या मैदानात तिने जणू चौकार मारला आहे.
खेडेगावातच प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण झालेल्या नीताचे महाविद्यालयीन शिक्षण कोल्हापूर व पुणे येथे झाले. जिद्द आणि परिश्रमाच्या जोरावर स्पर्धा परीक्षेतील चक्क तीन पदांवर यश मिळवत हॅटट्रिक साधली. आता राज्यसेवा परीक्षेच्या माध्यमातून विक्रीकर निरीक्षक पदासाठीही ती पात्र ठरली आहे. नीताने प्रथम मंत्रालयीन लिपिक, त्यानंतर राज्यात मुलीत दुसरी येत टॅक्स असिस्टंट पद प्राप्त केले. सध्या ती या पदावर पुण्यातील जीएसटी कार्यालयात कार्यरत आहे. गेल्या महिन्यात स्टेट एक्साइज सबइन्स्पेक्टर परीक्षेचा निकाल लागला. त्या पदासाठीही ती पात्र ठरली असतानाच राज्य सेवा परीक्षेतून विक्रीकर निरीक्षक पदासाठी यश मिळविले आहे. तिला वडील चंद्रकांत, पुण्यातील अभियंता असलेले चुलते दत्तात्रय तसेच आई व मित्रपरिवाराचे प्रोत्साहन लाभल्याचे नीता सांगते.