पिरळ-सावर्धनला दुरंगी लढत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पिरळ-सावर्धनला
दुरंगी लढत
पिरळ-सावर्धनला दुरंगी लढत

पिरळ-सावर्धनला दुरंगी लढत

sakal_logo
By

पिरळ-सावर्धनला
दुरंगी लढत
कसबा तारळे, ता. १५ : पिरळ (ता. राधानगरी) येथील पिरळ-सावर्धन ग्रुपग्रामपंचायत निवडणुकीसाठी सत्ताधारी राजर्षी शाहू महाविकास आघाडी व विरोधी भैरवनाथ विकास आघाडी अशा दोन आघाड्यांमध्ये दुरंगी लढत होत आहे.
सरपंचपद इतर मागासवर्गीय महिला गटासाठी आरक्षित असून सत्ताधारी आघाडीतर्फे माजी सरपंच संदीप पाटील यांच्या पत्नी अस्मिता पाटील व विरोधी आघाडीतर्फे माजी सरपंच अमरेंद्र मिसाळ यांच्या पत्नी अंजली मिसाळ या निवडणूक लढत आहेत. तीन प्रभागातून नऊ सदस्य पदांसाठी परस्परांविरोधात अठरा उमेदवार निवडणूक लढवत आहेत. सत्ताधारी आघाडीचे नेतृत्व जिल्हा परिषदेचे माजी सदस्य (कै.) बापूसाहेब पाटील- सावर्धनकर यांचे पुत्र विशाल पाटील, विद्यमान सरपंच मारुती चौगले, माजी सरपंच संदीप पाटील, माजी सभापती दिलीप कांबळे, विद्यमान सदस्य आर.डी. चौगले करीत असून विरोधी आघाडीचे नेतृत्व अमरेंद्र मिसाळ, माजी उपसरपंच संतोष पाटील, डी.जी.चौगले, मधुकर चौगले, आनंदराव पोवार, बाबुराव पोवार, शिवाजी रेडेकर आदी करीत आहेत.