
रोजगार मेळाव्यांच्या माध्यमातून अधिकाधिक गरजूंच्या हाताला काम देऊ : आमदार प्रकाश आबिटकर
01954
ग्रामीण भागात रोजगार देणार
आमदार आबिटकर; गैबी-राधानगरीत रोजगार मेळावा
कसबा तारळे, ता. ९ : ग्रामीण भागात टॅलेंट आहे;परंतु रोजगार नाही. रोजगार मेळावे घेऊन कौशल्य विकास विभाग व विविध आस्थापनांच्या मदतीने रोजगार देण्यासाठी प्रयत्नशील राहीन, असे प्रतिपादन आमदार प्रकाश आबिटकर यांनी केले.
गैबी-राधानगरीत जेनेसिस कॉलेजमध्ये रोजगार मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाचे सहाय्यक आयुक्त संजय माळी, पंचायत समितीचे माजी उपसभापती अरुण जाधव, अशोक वारके, विजय बलुगडे आदींची उपस्थिती होती. प्राचार्य शोभराज माळवी यांनी स्वागत केले. ‘जेनेसिस’चे संस्थापक व गोकुळ दूध संघाचे संचालक अभिजीत तायशेटे यांनी प्रास्ताविकात मेळाव्याचा हेतू सांगितला.
मेळाव्यात जिल्ह्यातील १८ आस्थापनांनी सहभाग नोंदवत पंधराशे नोकऱ्या उपलब्ध केल्याचे सहा. आयुक्त माळी यांनी सांगितले. याप्रसंगी तालुक्यातील पहिल्या न्यायाधीश प्रगती वरुटे, पोलिस उपनिरीक्षक प्रमोद पाटील, परिवहन अधिकारी प्रतीक मोहिते, करनिरीक्षक नीता पाटील आदींसह सत्यजित पाटील, सुशांत माळवी, सुहास पाटील, धनाजी पाटील, रवींद्र कातकर, सागर कातकर, काजल कांबळे, सुहास पाटील, अक्षय पोवार, विकास माळवी, ऋतुराज कांबळे यांचा निवडीबद्दल सत्कार झाला. प्रगती वरुटे, प्रमोद पाटील, संग्राम पाटील, अभिजीत पाटील, संदीप पाटील, अमरेंद्र मिसाळ, संतोष पाटील, संजय पाटील, फत्तेसिंह भोसले, मारुती चौगले, दादा सांगावकर, सतीश फणसे, दीपक शेट्टी, चंद्रकांत चौगले, राजेंद्र चौगले, राजू वाडेकर, सुनील जठार, विलास पाटीलसह पदाधिकारी उपस्थित होते. प्राचार्य कुणाल मंडलिक यांनी सूत्रसंचालन, विश्वास पाटील यांनी आभार मानले.