प्रज्ञाशोध परीक्षेतील यश राधानगरीची शैक्षणिक गुणवत्ता अजून उंचीवर नेईल : गटशिक्षणाधिकारी कासार

प्रज्ञाशोध परीक्षेतील यश राधानगरीची शैक्षणिक गुणवत्ता अजून उंचीवर नेईल : गटशिक्षणाधिकारी कासार

01967
कसबा तारळेत प्रज्ञाशोध परीक्षा सराव चाचणी
कसबा तारळे : येथे पंचायत समितीचा शिक्षण विभाग व (कै.) ऋषीकेश पाटील स्मरणार्थ राजेंद्र पाटील-म्हाकवेकर यांच्या संयुक्त विद्यमाने ४ थी व ७ वीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रज्ञाशोध परीक्षा सराव चाचणी झाली. गटशिक्षणाधिकारी बी. एम. कासार प्रमुख उपस्थित होते. अशोक वागरे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. शिक्षक नेते जोतिराम पाटील म्हणाले, ‘ऋषिकेशच्या स्मृतिप्रीत्यर्थ साडेचार हजार विद्यार्थांसाठी सराव चाचणीला अर्थसाहाय्य करणाऱ्या राजेंद्र पाटील यांचे सामाजिक भान कौतुकास्पद आहे.’ यावेळी प्राथमिक शिक्षक बँकेचे संचालक राजेंद्रकुमार पाटील, बाळासाहेब पोवार, शौकत बक्षू आदींची भाषणे झाली. दत्तात्रय पाटील, शिक्षणविस्तार अधिकारी ए. वाय. पाटील, अनंत तेली, मधुकर मुसळे, डाॅ. सुनील ऱ्हायकर, मिलींद कानेटकर, संदीप पाटील, हाकिम बलवंड, बाळासाहेब देसाई, नाना पाटील, विजय पाटील, भूषण पाटील, रामचंद्र चौगलेंसह शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन शाहू चौगले, विक्रम वागरे यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com