Sun, May 28, 2023

कसबा तारळे येथे मारामारीत दोघेजण जखमी
कसबा तारळे येथे मारामारीत दोघेजण जखमी
Published on : 4 March 2023, 5:35 am
कसबा तारळेत दोन कुटुंबात मारामारी
कोल्हापूर : राधानगरी तालुक्यातील कसबा तारळे येथे झालेल्या शेजाऱ्यांच्या मारामारीत किरकोळ जखमी झालेल्या दोघांवर येथील सीपीआर मध्ये उपचार करण्यात आले. दरम्यान, याबाबत रात्री उशिरापर्यंत पोलिसांत गुन्हा नोंद झालेला नाही. कसबा तारळे येथील दोन कुटुंबियांत ही हाणामारी झाल्याचे समजते. त्यांच्यात जागेच्या हक्कावरून वाद असून प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. याच जागेच्या वादातून दोन कुटुंबांत दगडफेक होवून दोन-तीनजण जखमी झाल्याची चर्चा होती. याबाबत कोणताही गुन्हा नोंद नसल्याचे स्थानिक पोलिसांनी सांगितले.