दुर्गमानवाडची मुख्य यात्रा रविवारी; तर कसबा तारळेची सोमवारी : गाऱ्हाण्याच्या फेऱ्यांना मोठी गर्दी

दुर्गमानवाडची मुख्य यात्रा रविवारी; तर कसबा तारळेची सोमवारी : गाऱ्हाण्याच्या फेऱ्यांना मोठी गर्दी

01987

दुर्गमानवाड विठ्ठलाईदेवी
यात्रेचा उद्या मुख्य दिवस

कसबा तारळे, ता. १७ : पश्चिम महाराष्ट्र, कर्नाटक सीमाभागासह मुंबई, कोकणातील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या दुर्गमानवाड (ता. राधानगरी) येथील देवी श्री विठ्ठलाईची मुख्य यात्रा रविवारी (ता. १९) आहे. याच देवीची कसबा तारळे येथील मुख्य यात्रा सोमवारी (ता. २०) आहे.
जिल्ह्यातील प्रमुख जागृत देवस्थान अशी ख्याती असलेल्या देवीच्या यात्रेस लाखाहून अधिक भाविक दर्शनासाठी येतात. दुर्गमानवाड येथे स्थानिक ग्रामपंचायत प्रशासन व तालुका प्रशासनाने यात्रेच्या नियोजनाची पूर्वतयारी केली असून कसबा तारळे येथेही यात्रेची पूर्वतयारी अंतिम टप्प्यात आहे.
दरम्यान, येथे देवीच्या पंधरा दिवसांच्या सुरू असलेल्या यात्रोत्सवात रोज रात्री निघणाऱ्या गाऱ्हाण्याच्या फेऱ्यांना भाविकांचा मोठा प्रतिसाद मिळत असून ढोल-ताशा, लेझीम पथकांच्या साथीने निघणाऱ्या या फेऱ्यांना रंगत भरली आहे. स्थानिक व परिसरातील भाविकांसह जिल्हा व जिल्ह्याबाहेरून भाविक देवीसमोर गाऱ्हाणे (नवस) घालण्यासाठी हजेरी लावत आहेत. त्यानंतर मारुती मंदिरासमोरील पवित्र मांडावर करमणुकीचे कार्यक्रम सादर केले जात असून त्यांनाही ग्रामस्थ मोठा प्रतिसाद देत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com