कसबा तारळे येथे महाराजस्व अभियान उत्साहात

कसबा तारळे येथे महाराजस्व अभियान उत्साहात

02016

महाराजस्व अभियानाला
कसबा तारळेत प्रतिसाद
कसबा तारळे, ता. २७ : येथे महाराजस्व अभियानास चांगला प्रतिसाद मिळाला. ग्रामपंचायत, राधानगरी तहसील कार्यालय व तालुका पंचायत समितीतर्फे येथील न्यू हायस्कूलच्या पटांगणात आयोजित अभियानाचे उद्घाटन तहसीलदार मीना निंबाळकर व सरपंच विमल पाटील यांच्या हस्ते झाले.
यावेळी तहसीलदार निंबाळकर म्हणाल्या, ‘जिल्हाधिकारी व प्रांताधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनानुसार राधानगरी तालुक्यामध्ये मंडलनिहाय उपक्रम सुरू आहे. विविध योजनांचा गरजू लाभार्थ्यांना लाभ व्हावा व जागृतीसाठी उपक्रम होत आहे. नागरिकांनी लाभ घ्यावा.’ यावेळी सरपंच विमल पाटील, नायब तहसीलदार वायंगणकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र शेट्टे, ग्रामविकास अधिकारी एस. एस. पाटील, मंडल अधिकारी संजय गीते आदींची भाषणे झाली.
यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या सूचनेनुसार अंगणवाडीत पौष्टिक आहार मिळण्यासाठीची प्रात्यक्षिके पर्यवेक्षिका गड्डीवर यांच्या मार्गदर्शनाखाली दाखविली. तर तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र शेट्टे यांनी यावेळी प्रत्येकाने हेल्थ कार्ड काढून घ्यावे, असे आवाहन केले. यावेळी आधारकार्डमध्ये बदल तसेच नवीन आधारकार्ड काढण्यासाठी गर्दी केली. अभियानासाठी तलाठी विकास पाटील, अजिंक्य पाटील, कोतवाल संघटनेचे नेते तानाजी पाटील, शशी खडकेंसह न्यू हायस्कूलचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. यावेळी भोगावती कारखान्याचे संचालक रवींद्र पाटील, तालुका पुरवठा अधिकारी श्री. पोवार, श्री. पठाण, रेशन धान्य दुकानदार संघटनेचे पदाधिकारी बाबूराव पाटील आदींसह अधिकारी, कर्मचारी तसेच ग्रामपंचायतीचे सदस्य उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com