
कंथेवाडी येथे गुरुवारी ''शंकर धोंडीं'' च्या जन्मशताब्दीचा कार्यकम : वागळे, मुश्रीफांची प्रमुख उपस्थिती
माजी आमदार शंकर धोंडी पाटील यांच्या
जन्मशताब्दीनिमित्त उद्या विविध कार्यक्रम
कसबा तारळे :जनता दलाचे दिवंगत जिल्हाध्यक्ष व राधानगरी-भुदरगडचे माजी आमदार शंकर धोंडी पाटील यांच्या जन्मशताब्दीचा कार्यक्रम गुरुवारी (ता.२५) होत असून या कार्यक्रमासाठी सर्व संबंधितांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जनता दलाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव पाटील-कंथेवाडीकर व बिद्री साखर कारखान्याचे उपाध्यक्ष विठ्ठलराव खोराटे यांनी केले आहे. ते म्हणाले,‘आमदार हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली दुपारी ४ वाजता होणाऱ्या या कार्यक्रमासाठी ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्यासह आमदार पी.एन.पाटील, माजी आमदार के.पी. पाटील, श्रीपतराव शिंदे, संपतराव पवार-पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ए.वाय.पाटील, स्वाभिमानी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष प्रा.डॉ.जालंदर पाटील आदींची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. यावेळी (कै.) शंकर धोंडी पाटील यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे पूजन तसेच (कै.) पाटील यांच्याबरोबर विविध मोर्चे तसेच अन्य सामाजिक कामात सहभागी असणाऱ्या त्यांच्या ''साथी'' सहकाऱ्यांचा सत्कार होणार आहे. तसेच शंकर धोडी पाटील चॅरीटेबल ट्रस्टच्या वतीने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरातील रक्तदात्यांना भेटवस्तूंचे वितरण होणार आहे. राधानगरी तालुका शेतकरी सहकारी संघासह कंथेवाडी येथील विविध स्थानिक संस्था, मंडळे तसेच जनता दल परिवाराने या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.’