कंथेवाडीच्या विकासासाठी निधी देणार : आमदार आबिटकर
02165
ंकंधेवाडीच्या विकासासाठी
भविष्यातही भरीव निधी देणार
प्रकाश आबिटकर ः विकासकामांची कृती आराखडा बैठक
कसबा तारळे, ता. १४ : ज्या छोट्या वाडीने आमदार (कै.) शंकर धोंडी पाटील यांच्या रूपाने राधानगरी - भुदरगडच्या विकासासाठी एकेकाळी विधानसभेला लोकप्रतिनिधी दिला, त्या कंथेवाडीच्या विकासकामांसाठी मी यापुढेही निधी देत राहीन, अशी ग्वाही आमदार प्रकाश आबिटकर यांनी दिली.
कंथेवाडी (ता. राधानगरी) येथे माजी आमदार (कै.) पाटील यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आयोजित गावातील विकासकामांच्या कृती आराखडा बैठकीत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सरपंच जयश्री प्रदीप पाटील होत्या. (कै.) पाटील यांचे पुत्र व जनता दलाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव पाटील आणि उपसरपंच अरुणा भोपळे यांची प्रमुख उपस्थिती होती. आमदार आबिटकर म्हणाले, ‘नऊ वर्षांत मतदारसंघातील प्रत्येक गावात विकासासाठी निधी पोचविण्यात कमी पडलो नसून भविष्यातही गावांच्या पायाभूत व प्रलंबित विकासकामांना प्राधान्य देऊन मतदारसंघाचा चेहरामोहरा बदलणार आहे.’ प्रदीप पाटील यांनी स्वागत व माजी उपसरपंच बाळकृष्ण पाटील यांनी प्रास्ताविक केले. वसंतराव पाटील यांच्या हस्ते आमदार आबिटकर यांचा सत्कार झाला. श्री पाटील यांच्यासह ग्रामसेवक साताप्पा पाटील, दत्तात्रय पाटील, शाहू पाटील, साताप्पा पाटील, सागर पाटील, शिवाजी पाटील आदींची भाषणे झाली. पांडुरंग भोसले, आर. एस. पाटील, कृष्णात ऱ्हाटवळ, पप्पू पोवार, राजेंद्र ऱ्हाटवळ आदींसह विविध संस्थांचे पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते. नंदकुमार निर्मळे यांनी आभार मानले.