शिक्षणातील गुंतवणूकच तुम्हाला अधिकारी बनवेल - यजुवेंद्र महाजन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिक्षणातील गुंतवणूकच तुम्हाला अधिकारी बनवेल - यजुवेंद्र महाजन
शिक्षणातील गुंतवणूकच तुम्हाला अधिकारी बनवेल - यजुवेंद्र महाजन

शिक्षणातील गुंतवणूकच तुम्हाला अधिकारी बनवेल - यजुवेंद्र महाजन

sakal_logo
By

01097
तिटवे ः यजुवेंद्र महाजन यांचा सत्कार करताना डॉ. जगन्नाथ पाटील, सोबत प्रशांत पालकर, सुनील पाटील
-----------------
ःःःःः...तर नोकऱ्या तुमच्या मागे ः महाजन
कसबा वाळवे, ता. १५ ः स्वतःला ओळखून जिद्द आणि चिकाटीने आवडीच्या शिक्षणक्षेत्रात स्वतःची गुंतवणूक कराल तर नोकऱ्या तुमच्या मागे लागतील, असे प्रतिपादन दीपस्तंभ स्पर्धा परीक्षा संस्थेचे अध्यक्ष यजुवेंद्र महाजन यांनी केले.
ते तिटवे (ता. राधानगरी) येथील शहीद लक्ष्मी महाविद्यालयामध्ये ‘विविध स्पर्धा परीक्षांमधील संधी’वर बोलत होते. अध्यक्षस्थानी आंतरराष्ट्रीय शिक्षणतज्ज्ञ डॉ. जगन्नाथ पाटील होते. महाजन म्हणाले, ‘स्पर्धा परीक्षांचा प्रसार खेड्यापाड्यांत झाल्याशिवाय खेड्यांतील मुलांना उच्च शासकीय नोकरी मिळणार नाही. स्पर्धा परीक्षा स्पर्धेच्या जगात जगायचं कसं आणि टिकायचं कसं हे शिकवतात.’ डॉ. जगन्नाथ पाटील म्हणाले, ‘येणारे दशक महिलांचे आहे. त्यादृष्टीने विद्यार्थीनींनी स्पर्धा परीक्षेत स्वतःला झोकून द्यावे.’ कार्याध्यक्ष प्रा. सुनील पाटील यांनी स्वागत, प्राचार्य प्रशांत पालकर यांनी प्रास्ताविक केले. याप्रसंगी संस्थाध्यक्षा वीरपत्नी लक्ष्मीबाई पाटील उपस्थित होत्या. सानिका पाटील हिने सूत्रसंचालन तर प्रा. निवेदिता गुरव यांनी आभार मानले.