
31 डिसेंबर अक्कलकोट ! गेली 14 वर्षे चांदेकरवाडी तरुणाईने जपली परंपरा.
01101
चांदेकरवाडी : चांदेकरवाडी येथील तरुण अक्कलकोटकडे रवाना होतानाण
चांदेकरवाडीवासीयांचा थर्टी फर्स्ट अक्कलकोटला
कसबा वाळवे - चांदेकरवाडी (ता.राधानगरी) येथील तरुणाईने १४ वर्षे ३१ डिसेंबर अक्कलकोटला साजरा करुन नववर्षाचे स्वागत करण्याची अध्यात्मिक परंपरा जपली आहे
कसबा वाळवेतील संजय बाबूराव घाटगे यांनी ३१ डिसेंबर २००९ मध्ये सात तरुणांना घेऊन अक्कलकोटला गेले. नंतर १४ झाले. याच मुलांनी घाडगे मामांची प्रेरणा घेऊन कार्य अव्यातपणे सुरू ठेवले असून त्यालाच आता ‘स्वामी समर्थ अध्यात्मिक तरुण मंडळ’ असे रूप प्राप्त झाले आहे. ९० तरुण या मंडळात कार्यरत असून हव्यातपणे ३१ डिसेंबर अक्कलकोट येथे साजरा करत आहे. गावातील पाण्याच्या टाकी जवळील वसाहतीला "स्वामी समर्थ नगर" नाव दिले असून येथे बस थांबाही केला आहे. २००९ पासून प्रमुख स्वामीभक्त अनुप खोत, डेप्युटी सरपंच प्रविण खोत यांनी अथकश्रम घेतले असून संदीप मोरबाळे, दिलीप खोत, सुनील खोत,पांडुरंग पताडे,बापूसो खोत,गुंडाप्पा खोत,संदीप पताडे,अलंकार सुतार,नवनाथ भाट, साताप्पा पसारे,संजय कुऱ्हाडे,सागर नाना खोत, नामदेव खोत,शरद पसारे आदींचे त्यांना सहकार्य आहे.