अर्जुनवाडा कुस्ती मैदानात पै. बालारफिक शेखने घुटना डावावर भारत मदनेला दाखवले आस्मान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अर्जुनवाडा कुस्ती मैदानात पै. बालारफिक शेखने घुटना डावावर भारत मदनेला दाखवले आस्मान
अर्जुनवाडा कुस्ती मैदानात पै. बालारफिक शेखने घुटना डावावर भारत मदनेला दाखवले आस्मान

अर्जुनवाडा कुस्ती मैदानात पै. बालारफिक शेखने घुटना डावावर भारत मदनेला दाखवले आस्मान

sakal_logo
By

अर्जुनवाडा मैदानात
बाला शेख विजेता
कसबा वाळवे - अर्जुनवाडा (ता. राधानगरी) येथील कुस्ती मैदानात महाराष्ट्र केसरी बाला रफिक शेख याने आक्रमक शैलीने उपमहाराष्ट्र केसरी भारत मदने याला घुटना डावावर आसमान दाखवत प्रथम क्रमांकाची चांदीची गदा पटकवली. अत्यंत चुरशीच्या दोन नंबरच्या कुस्तीत महाराष्ट्र चॅम्पियन रोहन रंडे याने महाराष्ट्र चॅम्पियन बाबासो रानगे याला घिस्सा डावावर चितपट केले.
सुदेश ठाकूर व अरुण बोंगाडे यांची कुस्ती तीस मिनिटांनंतर बरोबरीत सोडवली. अक्षय चौगुले, ऋषिकेश पाटील, वैभव माने, शिवप्रताप यादव यांच्या चटकदार कुस्त्यांनी कुस्ती शौकिनांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. मैदानात कृष्णात कांबळे, कुलदीप पाटील, हर्षवर्धन लोमटे, अभिजीत यादव,विघ्नेश पाटील, उज्वल कांबळे, निखिल कांबळे, अनिकेत हवालदार आदीसह १०० पेक्षा अधिक कुस्त्या झाल्या. पंच म्हणून प्रकाश खोत, बटू जाधव, बापू लोखंडे, दिनकर वागरे, रघुनाथ चौगुले, रामचंद्र पाटील, सुभाष वागरे यांनी काम पाहिले. मैदानात हिंदकेसरी विनोद चौगले, ए. वाय. पाटील, अरुण जाधव, सर्जेराव यादव, सचिन पाटील, नामदेव चौगले, अशोक यादव, प्रणव यादव आदी उपस्थित होते.