कुडाळ जावळीच्या सुपुत्राला वीरमरण - | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कुडाळ जावळीच्या सुपुत्राला वीरमरण -
कुडाळ जावळीच्या सुपुत्राला वीरमरण -

कुडाळ जावळीच्या सुपुत्राला वीरमरण -

sakal_logo
By

364
जावळीच्या सुपुत्राला वीरमरण
सकाळ वृत्तसेवा
सातारा, ता. २१ ः बामणोली तर्फ कुडाळमधील (ता. जावळी) जवान प्रथमेश संजय पवार (वय २२) यांना कर्तव्यावर असताना जम्मू सांबा ब्लॉक परिसरात अतिरेक्यांशी झालेल्या चकमकीत गुरुवारी (ता. १९) रात्री साडेदहाच्या सुमारास वीरमरण आले. त्यांचे पार्थिव उद्या (ता. २२) मूळगावी आणण्यात येणार असल्याची माहिती कुटुंबीयांकडून देण्यात आली.
सैन्य दलाकडून तीन महिन्यांपूर्वीच प्रथमेश यांना पहिले पोस्टिंग मिळाले होते. सैन्य दलात दाखल होण्याचे स्वप्न लहानपणापासूनच त्यांनी पाहिले होते. ते स्वप्न २२ व्या वर्षी त्यांनी पूर्ण केले. प्रथमेश यांचे मावस भाऊ अमोल गंगोत्रे यांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी रात्री जवान प्रथमेश हे जम्मू सांबा ब्लॉक परिसरात ड्यूटीवर कार्यरत होते. त्या वेळी अचानक दहशतवाद्यांशी चकमक सुरू झाली. दहशतवाद्यांच्या गोळीबाराला प्रत्युत्तर देतानाच प्रथमेश यांना गोळी लागली. त्यात ते गंभीर जखमी झाले होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवल्याची माहिती त्यांच्या घरी दूरध्वनीवरून सेना दलातील अधिकाऱ्यांनी दिली. या घटनेमुळे त्यांच्या कुटुंबीयांसह गावावर व संपूर्ण जावळी तालुक्यावर शोककळा पसरली आहे.
प्रथमेश यांचे मामा कदम विमानाने दिल्लीला गेले असून, नातेवाइकांसमवेत पार्थिव बामणोलीत त्यांच्या मूळ गावी आणण्यात येणार आहे. त्यांच्या मागे आई, वडील, लहान भाऊ असा परिवार आहे.
हुतात्मा प्रथमेश यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शालेय शिक्षण घेतले. प्रथमेश यांचे प्राथमिक शिक्षण डेरेवाडीतील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत, उच्च प्राथमिक शिक्षण बामणोलीतील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत, तर माध्यमिक शिक्षण इंग्लिश स्कूलमध्ये झाले. पाचवडमधील विद्यालयात त्यांनी बारावीपर्यंत शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांची सैन्य दलात निवड झाली. सैन्य दलात दाखल झाल्यानंतर प्रशिक्षण पूर्ण करून पहिल्या पोस्टिंगला तीन महिने झाले असतानाच त्यांना वीरमरण आले.-----------

KUD22B00364
प्रथमेश पवार

----------------पूर्ण-----------------

Web Title: Todays Latest Marathi News Kud22b00236 Txt Kolhapur1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..