
बाबासाहेब चौगुले वाढदिवस विशेष
पट्टी - विशेष
------------------------
बाबासाहेब चौगुले 18556
फोटो लहान वापरणे..
कल्लाप्पाण्णा आवाडे
प्रकाश आवाडे
-----------------
लीड
कुंभोज (ता.हातकणंगले) गावचे सुपुत्र,जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष व कर्मवीर ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष बाबासाहेब पारिसा चौगुले यांचा रविवारी(ता.१) ५८ वा वाढदिवस त्यानिमित्त...
-----------
बाबासाहेब चौगुले- विकासाभिमुख नेतृत्व
कुंभोज येथील बाबासाहेब चौगुले यांचा जन्म १ मे १९६४ रोजी सर्वसामान्य कुटुंबात झाला. प्राथमिक शिक्षण गावात, तर माध्यमिक शिक्षण बाहुबली येथे झाले. १९८३ मध्ये कोल्हापूर येथील आयटीआय प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर १९८५ मध्ये त्यांनी एसटी महामंडळात नोकरीस प्रारंभ केला. मात्र घरच्या शेतीकडे दुर्लक्ष होत असल्याने त्यांनी नोकरी सोडून शेतीवर लक्ष केंद्रीत केले. १९८० मध्ये त्यांनी अंकुश मंडळाची स्थापना केली. या मंडळाच्या माध्यमातून त्यांनी राजकिय व सामाजिक कार्यास सुरवात केली. १९९० मध्ये झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत ते पहिल्याच प्रयत्नात प्रचंड मतांनी विजयी झाले. गट नेत्यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांना सरपंचपदी विराजमान केले. सरपंचपदाच्या कारकिर्दीत उल्लेखनिय विकासकामांबरोबरच ग्रामस्वच्छता अभियानात राज्यात प्रथम क्रमांक पटकाविला. तत्कालिन मुख्यमंत्री शरद पवार यांच्या हस्ते जिल्हा परिषद, कोल्हापूर येथे झालेल्या कार्यक्रमांत प्रथम क्रमांकाच्या पुरस्काराने सन्मानित केले. तसेच पुणे विधान भवन येथे तत्कालिन ग्रामविकास मंत्री रणजित देशमुख यांनीही विशेष पुरस्काराने सन्मानित केले. सर्वसामान्यांना बचतीची सवय लागावी. त्यांची अर्थिक अडचण दूर व्हावी, या हेतूने श्री.चौगुले यांनी २००१ मध्ये कर्मवीर ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेची स्थापना केली. आज या संस्थेचा वटवृक्षात रूपांतर झाले आहे.
शेतक-यांच्या शेतीला पाणी मिळावे, त्यांचा अर्थिक स्तर उंचवावा म्हणून २००२ मध्ये श्रीराम शेतकरी पाणी पुरवठा संस्थेची स्थापना केली. संस्थेच्या माध्यमातून २२७ एकर शेती ओलिताखाली आली आहे. श्री.चौगुले प्रारंभीपासून आवाडे गटाचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. त्यांनी जिल्हा परिषदेची कॉग्रेसतर्फे मिळालेली उमेदवारी केवळ आवाडे यांच्या सांगण्यावरून सोडली होती. २००४ मध्ये ''जवाहर''चे संस्थापक माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे, आमदार प्रकाश आवाडे यांनी जवाहर शेतकरी साखर कारखान्याच्या संचालकपदी बिनविरोध निवड केली. निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून प्रतिमा सांभाळत प्रकाश आवाडे यांच्या माध्यमातून त्यांनी कुंभोजमध्ये राष्ट्रीय पेयजल योजना राबविपले योगदान दिले. कारखान्याच्या माध्यमातून गावातील पाणंद रस्ते केले. कारखान्याच्या ऊस उत्पादक सभासदांना शस्त्रक्रियेसाठी अर्थिक मदत मिळवून दिली. २०१३ मध्ये कुंभोज परिसरातील वाहनधारकांसाठी बीपीसी पेट्रोलिंक्स या नावाने पेट्रोल पंप सुरू केले.
२०१५ मध्ये त्याची जवाहरच्या उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. त्यांच्या उपाध्यक्षपदाच्या कारकिर्दीत २ नोव्हेंबर २०१७ रोजी रौप्यमहोत्सवी गळीत हंगाम प्रारंभ व शेतकरी मेळावा झाला. ऐतिहासिक सोहळ्याचे संस्थापक कल्लाप्पाण्णा आवाडे, अध्यक्ष प्रकाश आवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी नेटके संयोजन केले. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत त्यांनी कुंभोज ग्रामपंचायतीची सत्ता काबीज करण्याबरोबरच प्रभाग क्रमांक एक मधून मुलगा अनिकेत याला निवडून आणले. नुकतीच त्यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाली. त्यांनी ग्रामपंचायतीतील पाणी पुरवठा विभाग तसेच ग्रामसचिवालयाचे प्रलंबित बांधकाम सुरू करण्याचे प्रयत्न केले व ते काम पूर्णत्वास नेण्यासाठी आजही प्रयत्न करत आहेत. अनिकेत चौगुले हे श्री.चौगुले यांच्या घराण्यातील तिसरी पिढी राजकारणात सक्रिय आहे.बाबासाहेब चौगुले यांनी कुंभोजमधील पाणंद रस्ते विकसित करण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी मिळवला आहे. राहुल आवाडे यांच्याकडून ५ लाखाचा फंड त्यांनी त्यासाठी मिळवले. जवाहर तसेच विविध उद्योगधंद्यांत त्यांनी कुंभोजमधील ५० लोकांना नोकरीस लावले आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात कुंभोज येथील एसटी कर्मचाऱ्यांचे होत असलेली कुचंबणा पाहून त्यांनी त्यांना धान्य स्वरूपात मदत केली. धनगर समाजाचे कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात त्यांचा महत्त्वाचा सहभाग होता. त्याशिवाय क्रिकेट व फुटबॉल स्पर्धांचे आयोजन करण्यात त्यांचा महत्वपूर्ण सहभाग आहे. जवाहरला देशपातळीवरील नॅशनल शुगर फेडरेशनकडून सर्वात जास्त ऊस गाळप करणारा कारखाना म्हणून प्रथम क्रमांक मिळाला. त्यावेळी जवाहरचे उपाध्यक्ष म्हणून दिल्लीत त्यांनी तो पुरस्कार स्वीकारला.
गावातील नागरिकांसाठी अधुनिक बॅकिंग सेवा सुविधा मिळाव्यात, यासाठी त्यांनी इचलकरंजी मर्चंट, कल्लाप्पाण्णा आवाडे जनता सहकारी बँकेच्या शाखा सुरू करण्यास पुढाकार घेतला. गटनेते या नात्याने ग्रामसचिवालय, प्राथमिक आरोग्य केंद्र कार्यान्वित करण्यासाठी पाठपुरावा केला. त्यांच्या यशस्वी वाटचालीस पत्नी बीपीसी पेट्रोलिंक्सच्या संचालिका सन्मती चौगुले, मुलगा उपसरपंच अनिकेत चौगुले यांचे सहकार्य लाभत आहे. या उदयोन्मुख नेतृत्वाला लाख लाख शुभेच्छा!
पुरवणी संकलन- राजू मुजावर, कुंभोज.
Web Title: Todays Latest Marathi News Kum22b02178 Txt Kopcity Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..