
डॉ. आंबेडकर जयंती समितीतर्फे कुंभोजमध्ये विविध कार्यक्रम
डॉ. आंबेडकर जयंती समितीतर्फे
कुंभोजमध्ये विविध कार्यक्रम
कुंभोज, ता. ५ ः येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. येथील आंबेडकर चौकात पहिले पुष्प गुंफताना दयानंद मेहत्तर (गारगोटी) यांचा ‘हाक बाबाची - बुद्ध भीम गीतांचा’ कार्यक्रम झाला. महोत्सव समितीचे अध्यक्ष आगाज डोणे अध्यक्षस्थानी होते. शिवाजी डोणे, श्रीकांत डोणे, दीपक भोसले यांनी उद्घाटन केले. दिलीप माने, विकी कांबळे, शीतल कांबळे यांचा सत्कार करण्यात आला. दुसरे पुष्प गुंफताना वैभवी कांबळे (घारगावकर) यांनी ‘मी रमाई बोलतेय’ हे एकपात्री नाटक सादर केले. विशाल डोणे अध्यक्षस्थानी होते. अजय कुरणे, सिद्राम कांबळे, पोर्णिमा भोसले यांनी उद्घाटन केले. रणजित कांबळे, शिवाजी भानुसे, संजय भोरे, श्रीकांत नलवडे, आप्पासाहेब पाटील यांचा सत्कार झाला. यानंतर प्रा. सुकुमार कांबळे यांचे व्याख्यान झाले. किरण कांबळे, पांडुरंग भोसले यांच्या हस्ते उद्घाटन झाले. वैभव जमणे यांनी स्वागत केले. प्रमोद डोणे यांनी सूत्रसंचालन केले. स्वरूप नामे यांनी आभार मानले.
Web Title: Todays Latest Marathi News Kum22b02191 Txt Kopdist Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..