हिंगणगाव विरधवल विकास संस्थेत स्वाभिमानी आघाडीचीच सत्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हिंगणगाव विरधवल विकास संस्थेत स्वाभिमानी आघाडीचीच सत्त
हिंगणगाव विरधवल विकास संस्थेत स्वाभिमानी आघाडीचीच सत्त

हिंगणगाव विरधवल विकास संस्थेत स्वाभिमानी आघाडीचीच सत्त

sakal_logo
By

फोटो ओळी.-KUM22B03444
हिंगणगाव ः पॅनेल प्रमुख संजय देसाई यांना खांद्यावर घेवून आनंदोत्सव साजरा करताना सभासद

हिंगणगाव विरधवल संस्थेत
स्वाभिमानी आघाडीची सत्ता
सत्ताधाऱ्यांना सर्व जागा ः विरोधी आघाडीचा धुव्वा
कुंभोज ता.४ ः हिंगणगाव येथील हिंगणगाव विरधवल विकास सेवा संस्थेची अत्यंत चुरशीने झालेल्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणूकीत सत्ताधारी स्वाभिमानी विकास आघाडीने तेरा पैकी तेरा जागेवर निर्विवाद यश संपादन केले. विरोधी सहकार आघाडीला खातेही उघडता आले नाही.
३८५ पैकी ३६५ सभासदांनी मतदान केले. प्रगती बागल यांनी निवडणूक निणर्य अधिकारी काम पाहिले. एस. बी. नाईक, मकसुद सिंदी यांनी सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून काम केले.
या निवडणूकीच्या निमित्ताने आगामी ग्रामपंचायत निवडणूकीची रंगीत तालीमच असल्याने राजकिय वातावरण कमाली तापले होते. सत्ताधारी स्वाभिमानी आघाडीचे नेतृत्व माजी सरपंच संजय देसाई, दीपक पाटील, विश्वास कोळी, विलास कांबळे यांनी केले. विरोधी सहकार आघाडीचे नेतृत्व अजित पाटील,महावीर देसाई,अनिल पाटील यांनी केले.निकालानंतर समर्थकांनी गुलालाची उधळण व फटाक्याची अतिषबाजी करून अनंदोत्सव साजरा केला.
विजयी उमदेवार,कंसात पडलेली मते;संजय देसाई(२१६),दीपक पाटील(२३३),तानाजी कोळी(२०५),आनंदा मेटकर(१७९),विश्वास कोळी(२१७),प्रकाश तेरदाळे(१९७),अरूण देसाई(२०२),सुनिल देशमुख(२१६),बाहुबली पाटील(२१२),अशोक सपकाळ(२०२),आण्णा नाडे(२०६),सरस्वती कुंडले(२०८),जयश्री पोवार(१९५)

Web Title: Todays Latest Marathi News Kum22b02193 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top