समंतभद्र महाराजांचे विचार अंगीकारा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

समंतभद्र महाराजांचे विचार अंगीकारा
समंतभद्र महाराजांचे विचार अंगीकारा

समंतभद्र महाराजांचे विचार अंगीकारा

sakal_logo
By

समंतभद्र महाराजांचे विचार अंगीकारा
धनराज बाकलिवल; बाहुबली विद्यापीठाचा वर्धापन दिन
कुंभोज, ता. ३ ः गुरूदेव श्री समंतभद्र महाराजांचे विचार अंगीकारून आपली व समाजाची प्रगती करावी, असे मत बाहुबली ब्रह्मचर्याश्रमचे उपाध्यक्ष धनराज बाकलिवल यांनी व्यक्त केले.
बाहुबली येथील श्री बाहुबली ब्रह्मचर्याश्रम व विद्यापीठाचा ८८ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. बाहुबली विद्यापीठाचे कोषाध्यक्ष बाबासाहेब पाटील अध्यक्षस्थानी होते. संचालक गोमटेश बेडगे, पर्वराज पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. या वेळी दहावी व बारावीमध्ये शंभर टक्के निकाल लागलेल्या सन्मति विद्यालय (तारदाळ), रत्नसागर हायस्कूल (निमशिरगाव), सरस्वती हायस्कूल (टाकळीवाडी), दादा नाना भोकरे हायस्कूल (कवठेसार), जनतारा कल्पवृक्ष विद्यामंदिर (जयसिंगपूर), एम. जी. शहा विद्यामंदिर व जुनिअर कॉलेज (बाहुबली), आक्काताई नरसाप्पा नांद्रेकर ज्युनिअर कॉलेज (जयसिंगपूर) तसेच पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा गुणवत्ता यादीतील विद्यार्थी निरंजन बनकर व वृषाली खोंद्रे यांचा तर पूर्व माध्यमिक शिष्यवृत्तीधारक विद्यार्थिनी रिया बिरादार हिचा सन्मान केला. प्रमोद शहा, तात्यासाहेब अथणे, रवींद्र खोत, वृषभनाथ मलिकवाडे, दीपक वाडकर, एस. एस. पाटील, संजय तपासे, दादासो वाडकर, नेमिनाथ बिनीवाले, अजित शेट्टी, नेमिनाथ बाळीकाई, अरुण चौगुले, रवींद्र देसाई उपस्थित होते. एस. बी. चौगुले यांनी स्वागत केले. स्नेहल पाटील व स्मिता निटवे यांनी सूत्रसंचालन केले. अनिल हिंगलजे यांनी आभार मानले.

Web Title: Todays Latest Marathi News Kum22b02263 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..