गावतलावाचे सुशोभिकरण करावे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गावतलावाचे सुशोभिकरण करावे
गावतलावाचे सुशोभिकरण करावे

गावतलावाचे सुशोभिकरण करावे

sakal_logo
By

03623
-------------
गावतलावाचे सुशोभिकरण करावे
कुंभोजला ग्रामस्थांमधून मागणी; बोटींग क्लबही सुरू करावे
राजू मुजावर ः सकाळ वृत्तसेवा
कुंभोज, ता. ७ ः येथील गाव तलावाचे सुशोभिकरण करावे, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे. गावच्या दक्षिणेस सुमारे दहा एकर क्षेत्रात गावतलाव आहे. ग्रामपंचायतीद्वारे गावतलावातील पाण्याच्या मासेमारीसाठी लिलाव करण्यात येतो. यातून ग्रामपंचायतीला उत्पन्न मिळते. या तळ्याचे सुशोभिकरण झाले तर एक छोटेसे पर्यटनस्थळ म्हणून नावारूपास येणार आहे.
गावतलावाच्या पूर्वेस श्रध्दास्थान हजरत शाह खत्ताल हुसेन दर्गा आहे. १९७२ मध्ये गावकऱ्यांनी श्रमदानातून या तलावाची निर्मिती केली आहे. या तलावाने अनेक वर्षे गावकऱ्यांची तहान भागवली आहे. त्यामुळे तलावाबद्दल गावकऱ्यांमध्ये विशेष अस्मिता आहे. तलावाचे संवर्धन व्हावे अशी मागणी अनेक वर्षे सातत्याने होत आहे. तलावाचे सुशोभिकरण करण्यासाठी शासन, राजकीय नेत्यांकडून निधी मिळावा, अशी मागणी होत आहे. दीपक चौक व वारणा हार्ड वेअरपासून तलावास जाणाऱ्या रस्त्याचे डांबरीकरण करावे, गावतलावात असणारे जल वनस्पती व तलावच्या काठावर असणारे झाडे-झुडपे काढण्यात येऊन परिसराचे सुशोभिकरण व्हावे. तलावात बोटींग क्लब सुरू केले तर ग्रामपंचायत तिजोरीत भर पडणार आहे.
--------------
मंत्रालयात प्रस्ताव
येथील ग्रामपंचायतीतर्फे तत्कालिन उपसरपंच कलगोंडा पाटील यांनी याबाबतचा प्रस्ताव मंत्रालयात सादर केला आहे. युवासेनेतर्फे डॉ. सत्यजीत तोरस्कर यांनी तत्कालिन पर्यावरण मंत्री अदित्य ठाकरे यांना दिले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kum22b02297 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..