कर्मवीर भाऊराव पाटील यांना अभिवादन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कर्मवीर भाऊराव पाटील यांना अभिवादन
कर्मवीर भाऊराव पाटील यांना अभिवादन

कर्मवीर भाऊराव पाटील यांना अभिवादन

sakal_logo
By

03734
---------
कर्मवीर भाऊराव पाटील यांना अभिवादन
कुंभोज, ता. २२ ः येथील सुपुत्र, ‘रयत’चे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती साजरी केली. येथील मुख्य बसस्थानक परिसरातील कर्मवीरांच्या अर्धपुतळ्यास ग्रामपंचायत, कर्मवीर फाउंडेशन, विविध संस्था, सामाजिक कार्यकर्ते, कर्मवीरप्रेमींनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. कर्मवीर शैक्षणिक संकुलात झालेल्या कार्यक्रमात कर्मवीरांच्या व रयत माऊली लक्ष्मीबाई पाटील यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास ‘जवाहर’चे उपाध्यक्ष बाबासाहेब चौगुले, ‘शरद’चे संचालक आप्पासो चौगुले, गटनेते किरण माळी, उपसरपंच अनिकेत चौगुले आदींनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. माजी सरपंच माधुरी घोदे, शुभांगी माळी, भारती पोतदार, जयश्री जाधव, संभाजी सपकाळ, सावकर मिसाळ, गणपती शिंदेवाले, तातोबा पालखे, विस्तार अधिकारी भारती कोळी, ग्रामविकास अधिकारी चंद्रकांत गळवे उपस्थीत होते. दरम्यान सकाळी केंद्रीय प्राथमिक, कन्या, ऊर्दू, गर्ल्स, न्यू इंग्लिश स्कुल, आश्रम व रयत शाळांच्या विद्यार्थ्यांनी गावातील प्रमुख मार्गावरून फेरी काढली. रयत शाळेच्या विद्यार्थ्यांनी विविध वेशभूषेसह काढलेला चित्ररथ लक्षवेधी होता.

Web Title: Todays Latest Marathi News Kum22b02357 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..