कुंभोज येथे परमपूज्य श्रुतसागर महाराज यांच्या अस्थिकलशाची मिरवणूक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कुंभोज येथे परमपूज्य श्रुतसागर महाराज यांच्या अस्थिकलशाची मिरवणूक
कुंभोज येथे परमपूज्य श्रुतसागर महाराज यांच्या अस्थिकलशाची मिरवणूक

कुंभोज येथे परमपूज्य श्रुतसागर महाराज यांच्या अस्थिकलशाची मिरवणूक

sakal_logo
By

03759
कुंभोज : येथील श्रावक-श्राविकांच्या वतीने काढण्यात आलेल्या अस्थिकलश मिरवणूक.

श्रुतसागर महाराजांचा अस्थिकलश कुंभोजमध्ये
कुंभोज ः प.पू. आचार्य श्रुतसागर महाराजांचा अस्थिकलश येथे आणण्यात आला. आचार्य श्री श्रुतसागर महाराज यांचे मलखेड (जि. गुलबर्गा) येथे यमसल्लेखनापूर्वक निधन झाले. शनिवारी त्यांचा अस्थिकलश कुंभोज येथे मलखेड गुलबर्गावरून आणण्यात आला. येथील अदिनाथ, पाश्वनार्थ, महावीर जिनमंदिरासमोर श्रद्धांजली वाहण्यात आली. यानंतर अस्थिकलशाची गावातून जैन श्रावक श्राविकांच्या वतीने मिरवणूक काढली. अस्थिकलश दादा खोत यांच्या मळ्यात दर्शनासाठी ठेवला आहे. माजी जिल्हा परिषद सदस्य बाबासाहेब पाटील यांचे हस्ते परमपूज्य श्रुतसागर महाराजांचे प्रतिमेचे पूजन झाले. यावेळी श्रुतसागर महाराजांच्या समाधी बांधकामासाठी पद्मावती बापूसाहेब चौगुले यांनी ५१ हजारांची देणगी जाहीर केली. आचार्य श्री श्रुतसागर महाराजांचा चातुर्मास कुंभोजला चार वेळा झाला आहे.