कुंभोजसह परिसरात पंचनाम्याचे काम सुरू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कुंभोजसह परिसरात पंचनाम्याचे काम सुरू
कुंभोजसह परिसरात पंचनाम्याचे काम सुरू

कुंभोजसह परिसरात पंचनाम्याचे काम सुरू

sakal_logo
By

कुंभोजसह परिसरात
पंचनाम्याचे काम सुरू
कुंभोज ता.३० ः ऑक्टोबर महिन्यात पडलेल्या अवकाळी पावसामुळे येथील सोयाबीन, भुईमूग, पालेभाज्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या पिकांचा पंचनामा करण्याचे आदेश राज्य शासनाकडून देण्यात आले आहेत. त्यानुसार पंचनामे करण्याचे काम सुरू झाले आहे. गावकामगार तलाठी संभाजी घाटगे, कृषी सहायक के. एल. माने, पिंटू पांडव यांनी थेट शेतक-याच्या शेतात जाऊन पंचनामा करण्यास सुरुवात केली आहे. येत्या दोन-चार दिवसांत पंचनामे पूर्ण करण्याच्या दृष्टीने अधिकाऱ्यांनी तयारी केली आहे. ऑक्टोबर महिन्यात खरीप हंगामातील पिकांचे अवकाळी पावसाने मोठे नुकसान झाले आहे. सुमारे पंधरा दिवस सतत मुसळधार पाऊस पडला असल्याने शेतात सर्वत्र पाणीच पाणी साचले होते. या पावसाने हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला होता. सोयाबीन, भुईमूग, पालेभाजी यांसह अन्य पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसान झालेल्या पिकांचे त्वरित पंचनामा करण्याचे आदेश राज्य शासनाने दिले होते. त्या अनुषंगाने कुंभोजमधील नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्यासाठी महसूल विभागाने कंबर कसली असून थेट शेतक-यांच्या बांधावर जावून नुकसानीचे पंचनामे करण्यास सुरुवात केली आहे. येत्या दोन-चार दिवसांत पंचनामे पूर्ण करू, असे गावकामगार तलाठी संभाजी घाटगे यांनी सांगितले. अवेळी पडलेल्या अस्मानी व सुलतानी संकटाने बळीराजा हतबल झाला आहे. अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे पूर्ण शासनाने तातडीने मदत द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.